काहितरी वेगळ करायचय........
पाणवठा जरी गढुळ असला तरीकाहितरी वेगळ करायचय........ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचयपुन्हा पाणवठयात येवून नहायचय.
काहितरी वेगळ करायचय........आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचायपानांच्या जाळीवर बसुन उडायचयमिटलेल्या श्वासांना आताअस्तित्वातात आणायचय.
काहितरी वेगळ करायचय........स्वप्नांच्या देशात भटकायचयप्रयोगानिशी शोधायचयभवनेच्या पंखात बळ घेऊनपुन्हा मायदेशी परतायचय.
काहितरी वेगळ करायचय........चिखलातल्या कमळाला फुलवायचयसुकलेल्या फुलांना जगवायचयमाती रुक्ष असलि तरीमातीतल्या माणसांसाठी जगायचय.
काहितरी वेगळ करायचय........एक स्वप्न उराशी बाळगायचयकाहि वेगळ करता नाहि आलं तरिमाणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय...................
No comments:
Post a Comment