"या छोट्याश्या आयुष्यात ठरवलच तर खुप काही करता येत....
नाही जमलच जर काही,
तर तुमच्या सर्वांसारख तेच तेच करुण रोज तिरडी बदलून नव्यान मरता येत.
ठरवलच तर माझ्यासारख हे आयुष्य रोज नव्या रंगांनी भरता येत....
नाहीतर तुमच्यासारख,
कुणाची तरी आठवन काढून इवलुश्या दोन डोळयांमधे तुडूम्ब भरता येत.
ठरवलच माझ्यासारख मनापासून मनातल्या आठवणीमधे झुरता येत....
तुमच्या सर्वांपासून दूर जाण्यासाठी,
मला अस शब्दांच्या खड्ड्यात खोल खोल स्वतःला सहज पुरता येत.
जिंकलेल्या डावाचा आनंद मला पावसाच्या थेम्बासारखा एकट्यानेच झेलता येतो...
एरवी तुम्ही नाही जमणार म्हणून,
सोडलेला डाव मला जिंकन्यासाठीच पुन्हा पुन्हा खेळता येतो.
हे असच माझाही आयुष्य पाण्याच्या थेम्बासारख खळखळत वाहत रहात....
माझ्या शब्दांमधे तुम्हीही रमलात म्हणून,
गालात हसून तुमच्या सर्वांकड़े पाहत रहात...."
No comments:
Post a Comment