Monday, March 14, 2011

.................तो बाप असतो.




बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
............ ........तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
............ ......... ......... ....तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
............ ......... ......... ..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
............ ......... ......... .....तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
............ ......... ......... ......तो बाप असतो

lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
............ ....तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
............ ..तो बाप असतो.

=


Saturday, March 12, 2011

एक विनंती आहे .....



एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायचच असेल
तर वेळच देऊ नका......

एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........

एक विनंती आहे .....
चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा
कंटाळाच येणार असेल तर कोणाला नंबर च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका.......

एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
secrets share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका.....

एक विनंती आहे .....
माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका ,
अनोळखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जाणुन घेऊ नका ....

एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....

एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ........! 

"निर्लज्ज व्हा सुखी व्हाल".



घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन
कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला
काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार
उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली
तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो.
नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते,
ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी
फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही
किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले
ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर
होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt
+ Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी.
फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत.
बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात...
मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने
पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे
किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून
८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार
होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला
येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच
ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या
भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे
की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या
कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे
आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८
जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस
आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या
डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण
नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा
चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या
गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो
तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली".
तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस
येतात.)

घटना १ समाप्त

बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे
जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला
गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच
महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा".

धन्यवाद

बाबा मला का दिला देवाने रंग हा सावळा ?



एक लहान लेकरू त्याच्या काळ्या सावळ्या रंगामुळे, त्याला चीडवलेल्या शब्दांमुळे कंटाळून बाबांना प्रश्न विचारतंय.
बाबा मला का दिला देवाने रंग हा सावळा ?
हिणवी सारे जण म्हणतात हो कावळा.

आता बाबा लेकराला कसं उत्तर देतात ते पहा.

आहेस जशी तू तशी आवडे आम्हाला,
का ग भूळलीस तू त्या गोरया रंगाला.

काळा कुट्ट ग कावळा त्याचे नाव ऐसे घ्यावे,
पूर्वजांची होती माया म्हणुनी जेवू त्यांना द्यावे.

मग विचार मनाला तुझा रंग तरी कैसा,
बघ मनही म्हणेल तू वागशील तैसा.

काय वाईट आहे का काळा सावळा हा रंग,
साऱ्या ह्याच भांडणात होई जातीची ग जंग.

काळ्या रंगानेही केली साऱ्या जगावर मात,
घेतली बुद्धीच्या जोराने थोपटून आपली पाठ.

काळ्या सावळ्या रंगाची बघ झाली किती गाणी,
या रंगाची महती गीतकार सुद्धा जाणी.

कोणी ओळखता यावे देवाने रंग मारीयला,
गोरया रंगाचे ग श्रेष्ठ लोकांनी अर्थ लावियला.

देवाचा देव कृष्ण तोही बघ काळा,
सोळा सहस्त्र बायका घाली त्याला कि ग माळा.

निळे पांढरे आकाश तेही होते बघ काळे,
काळ्या रंगाची ती किमया दिसती पावसाळे.

एकमेकांत मिळूनी बनतात रंग सारे,
मग आपल्यात का भेदभाव हा असा रे.

हे खास कवी रसिकांसाठी.......
वाटे मज आता तुम्ही आहात हो रंग,
बघा रंग हे वेगळे झाले कवितेत दंग.
कविता ऐकुनी करती बात आपसात,
सारे सावळ्या कवीची कविता ऐकतात


Friday, March 11, 2011

प्रत्येकवेळी वाट पाहत तुझी मी






प्रत्येकवेळी वाट पाहत तुझी मी
कितीतरी वेळ थामबयाचे....
तू जरी उशिरा आलास तरी 
मी हसतमुखाने तुझे स्वागत करायचे 
खर सांगायचे तर तू उद्या भेटशील म्हणून 
मी रात्र रात्र जागले........
.... सांग ना मी काय चुकीचे वागले?

भेटल्यावर हि तुला घाई परत जाण्याची 
माझी मात्र धडपड स्वहतालच
समजाविण्याची...
काम असेल त्याला? लवकर जा तू 
तुला निरोप देताना मी अश्रू माझे लपवयाचे....
तरीही मी तुझ्यावर कधीच नाही वैतागले....
सांग ना मी काय चुकीचे वागले? अरे वाटत मला तू नेहमी सोबत राहाव 
तुला भेटण्याची मला गरज नसावी....
मग एक दिवस मला उशीर झाला म्हणून 
तू चार दिवस रुसून बसाव..........
त्या तुझ्या विरह वणव्यात मी एकटीच पेटले...
.........सांग ना मी काय चुकीचे वागले?

आज मात्र तू वेळेवर आलास 
मला वाटल तुझ्यावर माझ्या प्रेमाची जादू झाली...
हातात हात घेवून माझा तुझ माझ आता जमणार नाही 
म्हणत तू क्षणात नाहीसा झालास..............
मस्करी केली तुझी म्हणशील आणि परत तू येशील 
म्हणून मी तुझी वाट पाहत राहिले....... 
सांग ना मी काय चुकीचे वागले?

*आइस्क्रीम *



 
प्रसंग लहानसाच, पण हृदयस्पर्शी आठवणी जागवणारा! 
असाच एका संध्याकाळी पार्कमध्ये एकटाच बसलो होतो. मुलं खेळत होती. त्यांचे 
आईवडील जी काय हिरवळ बागेत होती त्यावर बसले होते. मुलं शहाण्यासारखी सीसॉ, 
घसरगुंडी, झोपाळा, यासाठी लाइन लावून उभी होती. 
जरा एका बाजूला एक आइस्क्रीमवाला होता. त्याच्याभोवती मुलं नी त्यांचा हट्ट 
पुरवणारे पालक होते. आइस्क्रीम खाणारी मुलं आइस्क्रीमवाल्याच्या गर्दीपासून 
थोडी लांब उभी राहून आइस्क्रीम खात होती. त्यातल्या एका मुलानी आपलं आइस्क्रीम 
संपल्यावर दुसऱ्या आइस्क्रीमसाठी आपल्या वडलांकडे मागणी केली. बापलेक आर्थिक 
सुस्थितीत असल्याचं त्यांच्या पेहरावावरून दिसत होतं. बहुधा पार्कबाहेर त्यांची 
गाडी उभी असावी असं वाटत होतं.
थोड्या अंतरावर दुसरा मुलगा आपलं आइस्क्रीम संपवत होता. त्याच्याबरोबर त्याची 
आई होती. दोघांच्या पेहरावावरून त्यांची परिस्थिति बेताची असावी हे कळत होतं. 
मुलाला बरोबर घेऊन त्याचे वडील पुन्हा आइस्क्रीमवाल्याकडे निघाले. आईबरोबरच्या 
मुलानी ते पाहिलं नि त्यालाही आणखी एक आइस्क्रीम हवंसं वाटायला लागलं. "आता 
नाही, पुरे आता" म्हणत ती त्याला दूर घेऊन जायला लागली. तिच्या आजच्या मजा 
करण्याच्या बजेटमध्ये ते बसत नसावं. तिचा मुलगा वडलांबरोबर आइस्क्रीमवाल्याकडे 
जाणाऱ्या मुलाकडे बोट दाखवून कुरकुरत होता. <
मुलाबरोबरच्या वडलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यानीही आपल्या मुलाला 
आइस्क्रीमसाठी नाही म्हंटलं नि ते त्याला आइस्क्रीमवाल्यापासून लांब नेऊ लागले. 
आईनी आपल्या मुलाला ते दाखवलं. मुलाची समजूत पटली नाही. पण आपल्याकडे मुद्दा 
राह्यला नाही हे त्याच्या लक्षात आलं.
माझ्यापासून थोड्याच अंतरावर हा प्रकार घडला होता. ओळखीची पर्वा न करता मी त्या 
मुलाच्या वडलांना गाठलं. आपणहून स्वतःची ओळख करून दिली. त्यांची ओळख विचारली. 
आम्ही बोलण्यात गुंतलो हे पाह्यलं नि मुलगा सटकला नि इतर मुलांत मिसळला. मी 
त्याच्या वडलांना विचारलं,
"तुम्ही मुलाला दुसरं आइस्क्रीम देणार होतात मग मागे का फिरलात?" 
"म्हणजे? " ते गोंधळले. त्यांना माझा प्रश्न अनपेक्षित असावा. मी त्याना 
पाह्यलेला सर्व प्रकार सांगितला.
ते हसले नि म्हणाले, "अहो, त्या बाईंचा मुलगाही याचं पाहून हट्ट करायला लागला 
होता. तिच्याकडे त्यासाठी पैसे नसावेत असं वाटलं". 
"त्या बाई तुमच्या ओळखीतल्या आहेत? "  
"नाही. ओळखीतल्या असत्या तर माझ्याबरोबर त्यांच्याही मुलाला मी आइस्क्रीम घेऊन 
दिलं असतं. "  
"ओळखीच्या नव्हत्या तरी तुम्ही त्यांचा विचार केलात? " 
"हो. त्याचं काय आहे काका" आमच्या वयातलं अंतर लक्षात घेऊन ते म्हणाले, "मुलं 
हट्ट करतात. त्याना आपल्या आईवडलांची परिस्थिती माहीत नसते. फक्त दुसऱ्या 
मुलाना मिळतं ते आपल्यालाही मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. पण त्यामुळे जे 
आईवडील ती पूर्ण करू शकत नाहीत त्यांची सार्वजनिक ठिकाणी गोची होते. त्यांना 
आपण इतरांसमोर उघडे पडतो म्हणून ओशाळलं वाटतं. मला त्या बाईच्या चेहऱ्यावर ते 
स्पष्ट दिसत होतं. तिला त्यातून सोडवायला दोनच पर्याय होते. एकतर माझ्या 
मुलाबरोबर तिच्याही मुलाला आइस्क्रीम देणं किंवा माझ्या मुलालाच आइस्क्रीम 
नाकारणं. पहिल्या पर्यायानी ती ज्यास्तच ओशाळली असती. म्हणून मी दुसरा पर्याय 
निवडला." 
"पण तुमच्या मुलाला वाईट वाटलं असेल... "  
"त्याची भरपाई मी नंतर करू शकतो. एव्हाना तो ते विसरलाही असेल. पण त्यावेळी एका 
आईची मुलाच्या निरागस हट्टामुळे जी अवस्था झाली होती त्यातून तिला सोडवणं मला 
ज्यास्त आवश्यक वाटलं. "
"तुम्ही दुसऱ्यांचं मन जाणता असं दिसतं. " मी कौतुकानी म्हणालो. 
माझ्या प्रशंसेमुळे ते जरासे संकोचले नि काहीशा गंभीरपणी म्हणाले, "अहो मीही 
लहानपणी खूप हट्ट करायचो. एक दिवस माझ्या लक्षात आलं की आपल्या हट्टामुळे 
आपल्या आईवडलांची चारचौघात ऑकवर्ड पोझिशन होते. त्या बाईंकडे पाह्यल्यावर मला 
त्याची आठवण झाली. "  
त्यानी आपल्या मुलाला हाक मारली. "चला निघतो. बाय" म्हणून त्यानी निरोप घेतला. 
ते गेल्यावर मलाही एक प्रसंग आठवला. आमची मुलं लहान असताना आम्ही सर्व नातेवाईक 
मिळून एकदा पिकनिकला गेलो होतो. आमच्यापैकी काहीशा सुस्थितीत असलेल्या एका 
नातेवाईकानी मी सर्वाना आइस्क्रीम द्यावं म्हणून आग्रह धरला. एकूण माणसं नि 
खिशातले मोजके पैसे याचा अंदाज घेऊन मी भीतभीतच हो म्हंटलं. दुकानात गेल्यावर 
हा नातेवाईक सर्वाना आग्रह करकरून आइस्क्रीम देत होता. प्रत्येक वाढत्या 
आइस्क्रीमबरोबर माझ्या काळजाचे ठोके वाढत होते. माझ्या एका बाजूला माझी दोन्ही 
मुलं उभी होती. हट्ट करण्याच्याच वयातली पण त्यावेळी काहीच मागत नव्हती. माझं 
लक्ष त्यांच्याकडे गेलं. मोठा धाकट्याला हळू आवाजात "ए, आपण आइस्क्रीम नाही 
घ्यायचं. बाबांकडे पैसे नाहीत. " म्हणाल्याचं मला स्पष्ट ऐकू आलं. 

भेटीचे प्रेमांतर ........


छान एका बागेत भेटण्याचे ठरले.

मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता

नाक मुरडले.

जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती

आज चक्क सलवार घालून आली होती

बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती   

अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले

तू कुठे गेला होतास?रागातच तिचे विचारणे 

आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास 

कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास

चल बसुया आत

भलताच दिसतोय वेगात


तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या

डोळ्यावर भिरकावत विचारले......

तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?

हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण

असा कसा रे तू अनरोमांटिक

अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक

रागाने उठून गेली ती तरातरा

मीही तिच्या मागे गेलो भराभरा

हातात घेउनी तिचा हात

म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज

कसला चढलाय तुझ्या रुपाला साज

बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......


आवडते मला तुझे रागावणे 

काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे

नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे

देशील का मला माझे हवे ते मागणे

काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे 

गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे

हवा आहे तुझा मखमली स्पर्श

वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष

लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली

तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली   

चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली

रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली.....