प्रत्येकवेळी वाट पाहत तुझी मी कितीतरी वेळ थामबयाचे.... तू जरी उशिरा आलास तरी मी हसतमुखाने तुझे स्वागत करायचे खर सांगायचे तर तू उद्या भेटशील म्हणून मी रात्र रात्र जागले........ .... सांग ना मी काय चुकीचे वागले?
भेटल्यावर हि तुला घाई परत जाण्याची माझी मात्र धडपड स्वहतालच समजाविण्याची... काम असेल त्याला? लवकर जा तू तुला निरोप देताना मी अश्रू माझे लपवयाचे.... तरीही मी तुझ्यावर कधीच नाही वैतागले.... सांग ना मी काय चुकीचे वागले? अरे वाटत मला तू नेहमी सोबत राहाव तुला भेटण्याची मला गरज नसावी.... मग एक दिवस मला उशीर झाला म्हणून तू चार दिवस रुसून बसाव.......... त्या तुझ्या विरह वणव्यात मी एकटीच पेटले... .........सांग ना मी काय चुकीचे वागले?
आज मात्र तू वेळेवर आलास मला वाटल तुझ्यावर माझ्या प्रेमाची जादू झाली... हातात हात घेवून माझा तुझ माझ आता जमणार नाही म्हणत तू क्षणात नाहीसा झालास.............. मस्करी केली तुझी म्हणशील आणि परत तू येशील म्हणून मी तुझी वाट पाहत राहिले....... सांग ना मी काय चुकीचे वागले?
|
No comments:
Post a Comment