Friday, September 2, 2011

charolya


पाऊस ओसरला सगळा तरी,
एक थेंब जवळ होता :
तू न्हवतास सोबत तेंव्हा ,
काजळ बनून डोळ्यात होता.



नजरेत नजर मिसळून बघ
सख्या शब्दांची तुला खाण दिसेल.
एक-एक शब्द उघडून बघ
इंद्रधनूची कमान हसेल .

वाहून नेताना सख्या आसवांना
पापण्यांनी पावसाला बांधून ठेवलंय.
ओठांना तुझ्या टिपण्यासाठी
मध बनवून 'पाकळ्यात' ठेवलंय .


मी सांगणार आहे माझ्या मनाला
तू चोरून येतोस ,मला भेटायला .
बघितलच कुणी सख्या तुला ,तर
जातोस पापण्यांच्या आड लपायला !!!!!!!!!!!

.....................वर्षा

अंगणात माझ्या मनीच्या

अंगणात माझ्या मनीच्या
मी सडा शिंपिला होता,
किरणांनी त्यावर आपुला
बघ रंग सांडिला होता.

फुलांनी त्यावर आपुला
गंध ओतिला होता,
वाराही मग तोवर
सख्या स्तब्ध थांबला होता.

तुला बोलवाया सख्या मी
चंद्रास धाडीला होता,
चांदण्यांनी बघ त्याचा
कसा रथ हाकिला होता.

पाहताच तुला सख्या रे
मी नयनात कोंडीला होता,
शिंपल्यातला बघ मोती
मनी खाक जाहला होता.

मनी तुलाच वसवुनी मी रे
ओलांडीला उंबरा होता,
दारात प्राजक्ताने
तेंव्हा संसार मांडीला होता!!!!

...............वर्षा

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे


तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत


तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.



कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

मी नीवडूंग जगलो नभात.



आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.

Tuesday, August 23, 2011

भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ



भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ
विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ

पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल
गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ

सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा
क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ

बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ
सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ