मी वेल लावली होती प्रेमाची
तू पाणी घालायला विसरलीस
प्रेम फुल फुलण्याआधीच
तू माझ्या प्रीतीला विसरलीस ...
गजरयात तुझ्या फुललेले ,
आपल्या प्रीतीचे फुल,
तुझ्या माझ्या प्रेमाची ,
बाग देतेय ते हि चाहूल ...
हृदयाची भाषा समाजावालीस तू ,
मनाच्या गाभार्यात डोकावलीस तू ,
तुझ्या माझ्या हृदयाच्या तारा जुळल्या ,
अन नकळत माझ्या प्रेमात पडलीस तू ...
विसरेन विसरेन म्हणता म्हणता,
तुझ्या आठवणीतच वेल निघून गेली ,
खरंच विसरलो तुला मी .... कि ,
माझ्या हृदयानी माझीच गम्मत केली ...
खोडलेस जरी लिहिता लिहिता ,
नाव तुझ्या हृदयातून,
किती लापवाशील त्याला ,
माझ्या नावापासून ...
मी पण शिकतोय आता ,
तुझ्या सारख वागायला,
मनात आठवणी लपवून ,
ओठावर हसू आणायला ...
No comments:
Post a Comment