Monday, August 13, 2012

मन हे वेडे आतुरलेले


मन हे वेडे आतुरलेले

मन हे वेडे आतुरलेले

♥ڿڰۣ♥ಌڿ♥ڿڰۣ♥ಌڿ♥ڿڰۣ♥ಌڿ

सांज वेळी फुललेले
सुवासाने दरवललेले.
तुझ्या मध्ये हरवलेले
मन हे वेडे आतुरलेले

स्वप्नात तुला भेटलेले
क्षण हे ते साठवनितले
प्रेमात तुझ्या भिजलेले
मन हे वेडे आतुरलेले

हृदयी खोलवर रुतलेले
वाऱ्याच्या झोक्यावर झुललेले
तुझ्या स्पर्शाने बहरलेले
मन हे वेडे आतुरलेले

चिंब पावसात भिजलेले
मनी माझ्या रुजलेले
क्षण ते आठवणीतले
मन हे वेडे आतुरलेले

क्षण हे ते कातरलेले
अमृत हे ते साठवणीतले
प्रेमात तुझ्या हरलेले
मन हे वेडे आतुरलेले

♥ڿڰۣ♥ಌڿनिरज ढाणे .♥ڿڰۣ♥ಌڿ

Saturday, March 3, 2012

मला सांगा सुख मंजे



मला सांगा सुख मंजे नक्की काय असत,
काय पुण्य असल की ते घर बसल्या मिळत..


दान घेताना नाही..
झोली हवी रिकामी,
भरता भरता झोली..
पुन्हा वाड्लेली,
आपण फ़क्त घेताना..
लाजायच नसत,

मला सांगा सुख मंजे नक्की काय असत,
काय पुण्य असल की ते घर बसल्या मिळत..

देव देतो तेव्हा छापर फाडून देतो,
हवा नको ते म्हन्याचा प्रश्नच नसतो,
आपण फ़क्त दोन्ही हात..
भरून घयाच नुसत.

मला सांगा सुख मंजे नक्की काय असत,
काय पुण्य असल की ते घर बसल्या मिळत.. 

- Prashant Damale Famous Marathi Natak Song


Friday, February 10, 2012

पिसे पहाटेचे.....



....................पहाटे थंडीच्या
.................... हिरव्या रानात
................... ऐने चमकती
................... कशिदा कामात

पहाटे रानात
वारा काकडला
स्वस्थ पहुडला
झाडा झुडपात

................ पहाटे नदीच्या
................. अंगावर कोणी
................. मऊ पांघरली
................. धुक्याची ओढणी

पहाटे राऊळी
आर्जवी भूपाळी
सोडा शय्या देवा
उठा वनमाळी

................... पहाटे दारात
................... सड्याचे शिंपण
................... रांगोळीने सजे
.................. अंगण अंगण

किलबिल कानी
जाग आली रानी
घुमे जात्यावर
मंजुळशी गाणी

..................पूर्व क्षितीजाशी
................. रेखिले गं कोणी
..................शुक्राचे गोंदण
.................. शशिच्या वदनी

रक्तिमा पूर्वेचा
शोभतो गालात
हासली गोडशी
गुलाबी पहाट

.................. धुक्यात सांडले
................. ऊन्हाचे आरसे
................. पहाटही वेडी
................. लावी बाई पिसे .......


- पुरंदरे.

वेध पहाटेचा



ढगाळलेल्या अस्मानाला,
वेध जणू रविकिरणाचा......
दगडामधल्या तृण फुलाला,
वेध सुगंधी मातीचा.......
दशदिशांत सुसाट वाऱ्याला,
रोखणाऱ्या शिखराचा.....
खळाळणाऱ्या सागराला,
वेध किनाऱ्याचा.....
ध्येयासक्त माणसाला,
वेध क्षितिजाचा....

जीवनाची पाऊलवाट,
अन मातीतल्या पाऊलखुणा....
कधी होईल पहाट,
हाच वेध मना....