Thursday, September 29, 2011

नको नको रे पावसा ...!!



नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत 

मृग



माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

-ग. दि. माडगुळकर

सागरा प्राण तळमळला !



ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;

मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .

तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,

'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'

विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,

तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,

सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !

भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,

गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !

जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.

ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,

तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!

सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.

प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.

भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,

तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला

सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?

त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?

जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,

कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,

सागरा, प्राण तळमळला || ४ ||


- स्वा. विनायक दामोदर सावरकर 

दगडाची पार्थिव भिंत



मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।

- मनमोहन नातू 

लेझिम चाले जोरात




दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे 

आम्ही कोण?



आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत 

सहानभूती



उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी

प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग

भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट

आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.

- कुसुमाग्रज 

गणपत वाणी



गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला

- बा.सी. मर्ढेकर  

विचित्र वीणा



निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून ज़ाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

- बा. भ. बोरकर 

तुतारी



एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

- केशवसुत 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख


एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

- ग. दि. माडगुळकर 

ऐल तटावर पैल तटावर



ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

- बालकवी 

नीवडून्गाच्या शीर्ण फुलाचे



नीवडून्गाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.

शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणी कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
कीती फीरावे... उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण ...

नीवडून्गाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची ...

- इंदीरा संत  

मी फुल तृनातील इवले



जरी तुझीया सामर्थ्याने
ढल्तील दीशाही दाही
मी फुल तृनातील इवले
उम्ल्नार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उम्लावे
ओठातील गाणे हसरे?

जीन्कील मला द्व्बींदु
जीन्कील तृनाचे पाते
अन स्वताला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते


कुर्वालीत येतील मजला
श्राव्नात्ल्या जलधारा
स्ल्स्लुन भीज्ली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला वीस्रावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुन्फावे?

येशील का संग पहाटे
कीर्नांच्या छेडीत तारा;
उधलीत स्वरातुनी भवती
हलू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
द्व्बींदु होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच वीस्रून यावे
मी तुझ्यात मज वीस्रावे
तू हस्त मला फुलवावे
मी नकलत आनी फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढल्तील दीशा जरी दाही
मी फुल तृनातील इवले
उम्ल्नार तरीही नाही

(मंगेश पाडगावकर )  

आजीचे घड्याळ



आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

- केशवकुमार 

पिपांत मेले ओल्या उंदिर;


पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

- बा.सी.मर्ढेकर 

अरे खोप्यामधी खोपा


अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

- बहीणाबाई चौधरी 

हन्स व नळराजा



न सोडी हा ऩळ भूमि पाळ माते...।
असे जाणोनी हन्स वदे त्याते....।।
हन्स हिन्सा नच घडो तुझ्या हाते..।
सोड राया जाईन स्वस्थळाते...।। 1।।

जाग जागी आहेत वीर कोटी..।
भले झुन्जारही शक्ति जया मोठी....।।
तया माराया धैर्य धरी पोटी..।
पाखरू हे मारणे बुद्धि खोटी....।।2।।.।

वधुनि माझी हे कनक रूप काया..।
कटक मुकुटादिक भूषणे कराया..।.
कशी आशा उपजली तुला राया..।
काय नाही तूजला दया माया...।।3।।

म्हातारी उडता न येचि तिजला, माता मदिया अशी।।
कान्ता काय वदू नव प्रसवती, साता दिसाची तशी ।।
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..।।
हातासाजी न्रुपा तुझ्या गवसलो. आता करावे कसे....।।4।।

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,।।
म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी..।।
मजही वध कराया पातकी पातला जो..।.।
वरूनि पति असा ही भूमि कैसी न लाजो..।।5।।

येणे परी परिसता अती दीन वाचा..।।
हेलावला नळ पयोधि दया रसाचा.।।
सोडी म्हणे, विहर जा अथवा फिराया..।।
राहे यथा निज मनोरथ हन्स राया..।।6।।

सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे..।
क्षणभरि निज देही मुक्ति विश्रान्ति चाखे..।।
स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले...।
कवळिती निज बन्धु बाष्प बिन्दु गळाले...।।7।।

निसावा घे काही, उडुनि लवलाही परतला...।
न्रुपाळाच्या स्कन्धि बसुनि मणिबन्धि उतरला...।।
म्हणे हन्स, क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे...।
दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे...।।8।।

ऐक राया तू थोर दया सिन्धु..।..
नीति सागरही तूचि दीन बन्धु..।।
निखन्दोनी बोलिलो नको निन्दु....।।
तुझे ऐसे उपकार जया वन्दु....।।9।।

हन्स मिळणे हे कठिण मयी लोकी...।
सोनियाचा तो नवल हे विलोकी..।।
तशा मजलाही सोडिले तुवा की..।
तुझा ऐसा उपकार मी न झाकी...।।10।।

किति रावे असतील तुझ्या धामी...।
किति कोकिळ ही सारिका तसा मी..।।
चित्त लागियले तूझिया लगामी...।।
न्रुपा योजी मज आपुलिया धामी...।।11।.

हे पाखरू मजसी येईल काय कामा...।
ऐसे न्रुपा न वद पूरित लोक कामा..।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी...।
छाया करी तपन दीप्तिस ही निवारी......

(कवी माहीत नाही)

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे


आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

-कुसुमाग्रज 

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर  

पैठणी



फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

-शांता शेळके 

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे



चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

-मंगेश पाडगांवकर 

या बालांनो



या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे, मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे,
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.
या बालांनो ! या रे या !
लवकर भरभर सारे या !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुंबाज भरे;
जिकडे तिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर जयांचे,
सोन्याचे
ते रावे,
हेरावे.
तर मग कामें टाकुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पांखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती,
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या !

-भा. रा. तांबे 

कोठुनि येते मला कळेना



कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

जरा अस्मान झुकले



ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !

- ना. धो. महानोर

पाऊस कधीचा पडतो



पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझयाच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा

-कवी ग्रेस 

निर्झरास



गिरिशिखरे,वनमालाही
कड्यावरुनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती,
जा हळुहळु वळसे घेत
पाचूंची हिरवी राने
वसंतमंडप-वनराई
श्रमलासी खेळुनि खेळ
ही पुढचि पिवळी शेते
झोप कोठुनी तुला तरी,
बालझरा तू बालगुणी,
दरीदरी घुमवित येई!
खेळ लतावलयी फुगड्या.
फिर गरगर अंगाभवती;
लपत-छपत हिरवाळीत;
झुलव गडे, झुळझुळ गाने!
आंब्याची पुढती येई.
नीज सुखे क्षणभर बाळ !
सळसळती गाती गीते;
हांस लाडक्या! नाच करी.
बाल्यचि रे! भरिसी भुवनी

- बालकवी  

गाई पाण्यावर



गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

- कवी बी 

अनामवीरा



अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

- कुसुमाग्रज 

हिंदबांधवा



रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

- भा. रा. तांबे 

उठा उठा चिऊताई



उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

- कुसुमाग्रज 

खबरदार जर टाच मारुनी




सावळ्या :

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार :

मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या :

आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"


वा. भा पाठक  

या झोपडीत माझ्या



राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ?मज्जाव? शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

- संत तुकडोजी महाराज.

कणा



ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज 

केवढे हे क्रौर्य!



क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- ना.वा.टिळक 

घाटातील वाट



घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

- सरिता पदकी 

इंजिनदादा - बालगीत




इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या

(कवी माहीत नाही) 

घाल घाल पिंगा वाऱ्या



घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !

- कृ. ब. निकुंब 

उगवले नारायण




उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

- बहिणाबाई चौधरी 

अरे, संसार संसार



अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

- बहिणाबाई चौधरी 

वेलीं


देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!

- ग. ह. पाटील 

घरटा


चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

- बालकवी

मधुघट


मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पड़ती घरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करी रोष न सखया, दया करी

नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी

तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी

- भा. रा. तांबे

लेझिम चाले जोरात



दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे

रंगरंगुल्या, सानसानुल्या,

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

- इंदिरा संत

टप टप टाकित टापा


टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

फुलपांखरूं


फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह.पाटील

मन -----


मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

श्रवाण मासि

श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी 

Friday, September 2, 2011

शून्य



आयूश्य धुडांळत झरला शून्य होता

एका ह्र्दयावर हरला शून्य होता।


तोडून बधं मिठितुन तीच्या सूटावे

तीने मुठित जणु धरला शून्य होता।


मैफ़ील सपंवुन उपडया पेल्यातून,

काळोख धुडांळत उरला शून्य होता।


जून्या जखमा तुटुन अश्या आल्यावर

पून्हां अश्रुनी जणु भरला शून्य होता।



पाहून अखेर जिवन त्या राखेपाशी

आता सरणावर सरला शून्य होता।



तेव्हां ति जरी विसरुन गेली शून्यास

तीच्या नयनात उतरला शून्य होता।


 .

कथा संपेल…



तुझ्या अस्तकाल कथेच्या
पानांनी घर भरुन गेले आहे…
अंधारभरल्या खिडकितुन
वाहणा-या वा-यावर,
अखेरदर्शी स्मरणांच्या धुळीचे टिंब,
त्याआधीच्या काहि ओळी…
..खोडुन चुकलेले…तर
काही चुकुन खोडलेले संदर्भ
तेव्हाचे… कपाच्या तळाशी
गोठलेले कॉफ़ीचे थेंब
तुझा घट्ट मिठिचा पाउस
नंतरच..निळसर डोळ्यांच आभाळ
हे लिहिताना..संपलेली शाई
भरभर सरल्या दिवसांच कॅलेंडर
त्या भान विसरल्या क्षणांची थरथर
अन….,
काहि अर्धवट आकृत्या
उडत आहेत वा-यावर…
घर भरुन गेलंय वा-याने
तेवढा…पदर सावर
घर वाहुन जाईल वा-याने
हा वारा थांबव..

..
.
कथा संपेल…

हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी


हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

“निळ्या फ़ुलांची रात”


तु एकट संध्यासमयी
या पाण्यावरली ओळ
सांग कशाने लिहिले
तु थेंबांवर आभाळ ?


हे लखलखती नव्याने
भगव्या देहाने विश्व
सुनसान ह्र्दयतीरावर
धावती कशाला अश्व

शांत सावल्यांभवती
तुझी उदासीन माया
तु थरथरते आलिंगन
अंधार पुर्ण सजवाया

उजळुन निघायासाठी
तोही घरभर फ़िरला
अन दिवेलागणीसाठी
तु निरांजनावर धरला

जीव जळाला म्हणुनी
डोळ्यात क्षणभर ओल
करुणेची साधुन वेळ
अंगणात पडावे फ़ुल

सुन्न जरासा दर्वळ
वा-यावर फ़िरत रहातो
तु शब्द तयाला देता
तो आभाळाला जातो

कवितेचा हट्ट्च होता
“निळ्या फ़ुलांची रात”
अशात ओंजळ ठरतो
तुझाच लिहिता हात

आज तुला सोडून ऑफिसला जाताना


आज तुला सोडून ऑफिसला जाताना
पुन्हा पायात अडखळतेय...
ट्रेनसाठी धावायचे सोडून
पुन्हा घराकडे वळतेय...

निघताना घेतलेली तुझी गोड पापी
अजून ओठांवर हुळहुळतेय...
आणि तुझ्या मुठीत तू घट्ट
पकडलेलं माझं बोट
मी अजून सोडवतेय...

तुझ्या मुखरसाने भिजलेली
माझ्या ड्रेसची बाही
मी अजूनही वाळवते...
तू काय करत असशील...
कशी असशील?
स्वतःला पुन्हा पुन्हा विचारतेय...
फोनची बटण दाबतेय...



लवकर लवकर दिवस संपू दे म्हणून
देवाला पुन्हा पुन्हा आळवतेय...
माहितेय ग मला,
मी खूप खूप कमी पडतेय...
आणि याच भावनेनं गं मी
आतल्या आत झुरतेय....

पण काय करू गं लाडके,
हेही सारं करावयालाचा हवं...
जगण्यासाठी जगण्याचं
मोल वेचायलाच हवं...
मोल मोजायचा म्हणून आणि म्हणूनच
कमवायलाच हवं...

आणि राणी, तुला खूप खूप शिकवून मोठ्ठ
करायचंय म्हणून... अडखळत का होईना,
उद्याही मला ऑफिसला जायलाच हवं...!

भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ



भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ
विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ

पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल
गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ

सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा
क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ

बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ
सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ

आले गळुन नयनात तुषार होते.



तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

charolya


पाऊस ओसरला सगळा तरी,
एक थेंब जवळ होता :
तू न्हवतास सोबत तेंव्हा ,
काजळ बनून डोळ्यात होता.



नजरेत नजर मिसळून बघ
सख्या शब्दांची तुला खाण दिसेल.
एक-एक शब्द उघडून बघ
इंद्रधनूची कमान हसेल .

वाहून नेताना सख्या आसवांना
पापण्यांनी पावसाला बांधून ठेवलंय.
ओठांना तुझ्या टिपण्यासाठी
मध बनवून 'पाकळ्यात' ठेवलंय .


मी सांगणार आहे माझ्या मनाला
तू चोरून येतोस ,मला भेटायला .
बघितलच कुणी सख्या तुला ,तर
जातोस पापण्यांच्या आड लपायला !!!!!!!!!!!

.....................वर्षा

अंगणात माझ्या मनीच्या

अंगणात माझ्या मनीच्या
मी सडा शिंपिला होता,
किरणांनी त्यावर आपुला
बघ रंग सांडिला होता.

फुलांनी त्यावर आपुला
गंध ओतिला होता,
वाराही मग तोवर
सख्या स्तब्ध थांबला होता.

तुला बोलवाया सख्या मी
चंद्रास धाडीला होता,
चांदण्यांनी बघ त्याचा
कसा रथ हाकिला होता.

पाहताच तुला सख्या रे
मी नयनात कोंडीला होता,
शिंपल्यातला बघ मोती
मनी खाक जाहला होता.

मनी तुलाच वसवुनी मी रे
ओलांडीला उंबरा होता,
दारात प्राजक्ताने
तेंव्हा संसार मांडीला होता!!!!

...............वर्षा

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे


तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत


तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.



कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

मी नीवडूंग जगलो नभात.



आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.

Tuesday, August 23, 2011

भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ



भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ
विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ

पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल
गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ

सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा
क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ

बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ
सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ

धुंद वारे अन शहारे,



मन उगी का धावणारे,
छळणारे... पळणारे...

धुंद वारे अन शहारे,
चिंबणारे... गुंतणारे...

तिला पाहुनी थांबणारे,
स्तब्धणारे... वळणारे...

वेड्यागत बेफामणारे,
शोधणारे... फसणारे...

आक्रंद आक्रंद रडणारे,
रूतणारे... दुखणारे...

आठवांत त्या फिरणारे,
रेंगाळणारे... सावरणारे...

आकंठ कधी भरणारे,
रमणारे... हसणारे...

मन उगी का धावणारे,
छळणारे... पळणारे...

तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले


तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले

अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे

दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या

मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा

तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?

कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी



हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

Friday, August 19, 2011

आता माझ standard वाढु लागलय…



एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…

पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald’s चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…

“वन रूम kitchen”मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…

जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…

तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं…
म्हनुणच ….
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय….
कारण …..
आता माझ standard वाढु लागलय.

charolya



जरी चालशी चोरट्या पावलांनी

तुझ्या चाहुलीने असा कंप होतो,

मनी गांगरावे, न काही सुचावे

दिसेना तरीही तुझा भास होतो..











तुझे गाल गोरे, परी त्यावरीची

खळी का असे हीच तक्रार आहे,

खिळूनी बसे दृष्टि तेथे पुन: ती

ढळेना म्हणूनीच बेजार आहे....








नसे लक्ष माझे तसे वेधण्याला

उगा येरझाऱ्या कशी मारते तू ?

कधी एकटी पाहुनी मी खुणावी

बहाणा नवा शोधुनी टाळते तू..








पावसाच्या धारा सख्या , मला बघ चिडवतात

तू बरोबर नसल्याची आठवण करून देतात

तू सोबत असताना ,मला त्यांना chidvaychay

मला मात्र वेगळ्या पावसात भिजायचय !!!!!!!!!!!!!!!

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा


तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!

झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!

जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू
तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !!!!!

असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी
असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !!!!!!!!

आई फ़क्त तुझ्यासाठी.......





आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...

इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....

थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...

सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...

अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....

सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही ....

ती केवळ सोबत होती


ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत सचेतन सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही

charoli

अशी कोण वाटेत आलीच नाही

कधी मी कुठे पाहिलेलीच नाही,

उगा स्वप्न ऐसे मनी राहिले ना

तरी मी कवी शब्द गुंफीत राही...!

हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !



अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं …

अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन्‌ उजेड पडलाय्‌ तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे …

अगं साता नवसानं नवरा मिळला तरी बि उडतीस तीनताड गं
अन्‌ दुस-या देखत निंदा नव-याची बायको हायेस का भित्ताड गं
अगं माझ्या रानी गं …

आरं आपल्या त्वोंडानं कौतुक करिशी वांगी सोलून नाकानं रं
अन्‌ थरथर कापत लगीन केलंस आई बापाच्या धाकानं रं
अरं माझ्या राजा हे …

अगं वडील मंडळी पुढं दावला नम्रपणा मी लाखाचा
पर उभ्या गावाला माझा दरारा, दादा हाय मी लोकांचा !

हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

ह्यांनी रुपयं दिलंतं पंधरा नि ह्यांच्या अंगात नव्हता सदरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

रुपयं राहिलं चौदा नि ह्यांच्या घरात नव्हता सौदा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपयं राहिलं त्येरा अन्‌ ह्यांच्या न्हाणीत फुटका डेरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपयं राहिलं बारा अन्‌ ह्यांच्या भनीला नव्हता थारा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपयं राहिलं अकरा नि ह्यांच्या मेव्हणीचा भारी नखरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता दहाची राहिली नोट नि ह्यांच्या घरात नव्हतं ताट
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपयं राहिलं नऊ नि मागल्या दारानं आली जाऊ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले आठ अन्‌ पडली माह्या दिराची गाठ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले सात न्‌ ह्यांच्या घरात नव्हतं जातं
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले सहा नि पोलिस पाटलाला पाजला चहा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले पाच नि ह्यांच्या आरशाला नव्हती काच
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले चार अन्‌ फुडल्या सोप्याचं मोडलंय दार
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले तीन नि ह्यांच्या आईचं आला फोन
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले दोन नि ह्यांच्या त्वोंडाला आली घान
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपया राहिला एक नि म्या हा दत्तक घेतलाय ल्येक
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - कृष्णा कल्ले, बालकराम
चित्रपट - केला इशारा जाता जाता (१९६५)

एवढच ना


एवढच ना ,एकटे जगु
एवढच ना…..

आमच हस ,आमच रड
ठेवुन समोर एकटेच जगु
एवढच ना…..

रात्रीला कोण ,दुपारला कोण
जन्माला अवघ्या ,या पुरलय कोण्
श्वासाला श्वास् क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगु
एवढच ना…..

आंगणाला कुंपण् , होतच कधी
घराला आंगण् ,होतच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपनाचे भासच भोगत् जगु
एवढच ना…..

आलात तर आलात, तुमचेच पाय
गेलात तर गेलात ,कुणाला काय
स्वताच पाय स्वताच वाट्
स्वताच सोबत होउन् जगु
एवढच ना…..

मातीच घर ,मातीच दार
मातीच्या देहाला, मातीचे वार
मातीच खरी मातीच बरी
मातीत माती मिसळत जगु
एवढच ना…..

मी रद्दी काढते

मी रद्दी काढते
बघता बघता वर्ष संपतं आणि सिल्याबस बदलतो
नव्याला जागा करायसाठी... मी रद्दी काढते

पुस्तकं नुकतीच लढाईवरून आलेली असतात
वह्यांना मात्र महिनाभर सक्तीचा आराम असतो
रोजच्या पाट्या टाकून पेपर ही कंटाळले असतात
त्यानाही राद्दीवाल्याच्या पोत्यात सुटकेचा मार्ग दिसतो

आधी कितीही रण गाजवलं असलं तरी
प्रत्येकाचा भाव ठरला असतो
आता यात वजनकाट्याच्या काय दोष..
जो तो आधीच वजनाने कमी भरलेला असतो!

किलो दर किलो ने वजनकाटा
कागदाचे ढीग चरू लागतो
आणि आपल्याला पाढे शिकवत
रद्दीवाला पोत भरु लागतो

हळूच डोकावतो एका पुस्तकाच्या पानातून
एक कागदाचा चिटोरा...
तिला द्यायचा राहून गेलेला
किंवा एखाद वेळापत्रक
त्याच्या रकान्यातून धावायचा
खूप खटाटोप केलेला !

सहज उलटताना वहीत दिसतं
गणिताच्या सरांचं टक्कल
गोळा-फुलीच्या मध्ये मध्ये
दिसते पाजळलेली अक्कल !

आता अर्धा-पाव किलोतून लक्ष उडते
आणि काळाची पाने उलटू लागतात...
जाण्याच्या तयारीत असलेली पुस्तकं
मग हवीहवीशी वाटू लागतात...!

जुन्या आठवणींच्या रद्दीने
मनाचं पोत भरून जातं
एक कायमची जागा करून
आणि एक पुस्तक रद्दीत जातं ....

काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल



काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल,
हृदयातील मन माझं facebook वरती आल.

तोंडाने भावना व्यक्त करायचो ते आता विसरले,
सारे शब्द जणू key board वरती घसरले,

मी म्हटले मनाला चल थोडा वेळ जाऊ,
मन म्हणाले मला, ती येते का ते पाहू.

तू गेलीस कि माझे शब्द तिथे कोण पोहोचवेल,
अन मी नसलो इथे, तर तुला कोण सुचवेल

आपण एक काम करू एकत्रच राहू,
ती येण्याची वाट दोघ आतुरतेने पाहू.

५ होते वाजले ती येण्याची झाली वेळ,
मन म्हणाले मला बंद कर तो पत्त्यांचा खेळ.

ती आली, मला म्हणाली आहेस का रे तु
मन म्हणाले मी तुझी वाट पाहतोय जानू.

ती म्हणाली हाई, कसा आहेस, आता तू बोल,
मी म्हणालो मनाला आता तूच टाक झोल.

खूप वेळ झाला अन भरपूर मारल्या गप्पा,
मन तिथेच होते पुढे जायीनाच टप्पा.

मन म्हणाले मला तीला भेटायला सांग जरा,
मी म्हणालो आत्ता नको वेळ येऊन देत बरा.

ती म्हणाली मला बाय, वाजले आहेत आठ,
मन म्हणाले मला तू का करतोस असा थाट

असंच रोज आमचं ( माझं आणि माझ्या मनाचं) भांडण होत राहिलं,
खर सांगा मित्रांनो तुम्ही कधी online प्रेम पाहिलं ?

आठवतं तुला त्या भेटीत

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होत
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होत

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होत
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होत

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होत
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

फरक कुठे पडला आहे….



लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचे|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचे|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जाते |
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देते |
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकीच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचे |
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचे |
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकीच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

हात होतो पुढे भिकार्‍यांचा


वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा

आज नसतील… काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्‍यांचा

राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्‍यांचा

शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्‍यांचा

एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्‍यांचा

एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्‍यांचा

मूक आहेत, मान्य आहे… पण
दोष आहे तुझ्या पुकार्‍यांचा

मी जमाखर्च ठेवला आहे
चोरलेल्या तुझ्या सहार्‍यांचा

आवराआवरी करू दोघे
घोळ आहे तुझ्या पसार्‍यांचा

शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्‍यांचा

तोंड माझे कुठे कुठे होते
सोसतो मी जुगार वार्‍यांचा

फक्त आहे तसे नसावे मी
‘बेफिकिर’सा विचार सार्‍यांचा

प्रीत आकळेना


जायबंदी पाखरू ते वेडे
फडफड कळीस सोसेना
परी विह्वळले ग पाखरू
कळीच खुलता खुलेना

तगमग त्या जीवाची
कळीस काही उमजेना
मुक्यापरी मिटुनी जाई
कळीच खुलता खुलेना

नाजूक कोवळ्या देठाला
नाजूकता कशी वळेना
रंगुनी गेली पाकळी परी
कळीच खुलता खुलेना

देवूनी तिज मायउबारा
पाखरू ढाळे आसवांना
दवबिंदू तो हिरमुसला
कळीच खुलता खुलेना

केली आर्जवता पाखराने
आळवूनि सूर्यकिरणांना
गंध शिवुनी गेला कळीला
कळीस दरवळ सापडेना

पाकळी पाकळी उमलली
पाखरास पारावार उरेना
खुलुनी खुलली कळी परी
कळीस दरवळ सापडेना

पाहता खुलत्या कळीला
जायबंदी पंखात उरेना
शोधूनी देण्या गंध तिला
पाखरू झेपले रानावना

गंधही तीतच रुजू होता
रानही तीतच पिसे होते
पाखराच्या गुजारणात
समीरणहि दंग होते

वेड्या दोन त्या जीवास
काहीच न्हवते उमजेना
प्रेमवेडे दिवाणे सारे
अंतरीची प्रीत उमजेना

नसलेलच असण तरी का शाश्वत उरल होत ??


विखुरलेल्या पायवाटेवरती
निर्जीवत्वाच बीज भिरकल होतं
पायाला काहीतरी सलत होतं
बोथट धारेच भय सुजत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चितेमध्ये ओल लाकूड
जळत होत जळत होतं
मातीच सोन होत होतं
सोन्याने मातीला मढवत होतं
भस्मात मन राख होत होतं
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चिरडलेल्या काट्याची
चिरगुट घेत घेतच
कुणीतरी जगत होतं
जगण्याला पुकारून
मरूनही जगत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .......

डसलेल्या विंचवाला दंश करीत
सावलीच सावज अंधाराला
सापडत होत सापडत होत
अन बेफिकीर उन उजाडून
छळवटून चित्कारत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं ........

प्रश्न खुंटीला टांगून
निवांत उत्तर दवडत होत
विटाळलेल मन मात्र
कधीच मालवल होत
सारच काही संपल होत
पण ....
नसलेलच असण तरी का शाश्वत उरल होत ??

तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं

तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं
तुला पाहिल्या नंतर स्वतःला हरवावसं वाटलं
तुझ्या हसण्यात मला हि थोड हसावंसं वाटलं
शांत राहून तुझ्या मनातलं सारे ऐकावसं वाटलं
तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं
बरेच बोलायचे होते तुझ्याशी पण थोडे थांबवसे वाटलं
तू पाहशील एकदा तरी माझ्या कडे म्हणून तुझ्या समोर यावेसे वाटलं
कधी मित्रांचे सोंग कधी mobile चे सोंग तर कधीच उगाच
पण फक्त तुझ्या समोर यावेसे वाटलं
तुला पाहिल्या नंतर एकांतात हि बंद डोळ्यांनी तुला पहावंसं वाटलं
स्वप्न ढघातल्या माझ्या प्रेम पावसात तुला हि भिजवावेसे वाटलं
मी तर आहेच तुझा प्रेम दिवाना तुला हि आपलं करावसं वाटलं
तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं
स्वतःला हरवून तुझ्यात वहावंस वाटलं
तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं
तुला पाहिल्या नंतर तुझ्या प्रेमात पडावस वाटलं

तु फ़क्त हो म्हण…



तुला मी स्वप्न देतो,
स्वप्नांना पंख देतो,
पंखाना बळ देतो…. तु फ़क्त हो म्हण…

तुला हवी ती चांदणी देतो..
तुझ्या चांदणीचा चंद्र होतो…
सारे डाग स्वतःवर घेतो…. तु फ़क्त हो म्हण….

तुला साती रंग देतो…
तुझ्या हाती इंद्रधनू देतो…
सारे रंग मिळूनही मी मात्र सफ़ेद रहातो… तु फ़क्त हो म्हण…

खर सांगायचं तर काय हवं ते दे देतो…
तुझ्याकडच तुलाच कसं देणार…
नाहितर म्हटलं असतं माझं काळीज देतो…. तु फ़क्त हो म्हण…

स्वप्न माजे चंद्र झाले .. अन आभाळा भेटले



फूल फूल बहरलेले बिलगतहे गारवा
झोप येइ न तुला अन जागतहे मारवा...

मारव्याचे सुर आणि गारव्याचा हा शहारा ..
आज मज़्य पापणिवर ..स्वप्न तुजे दे पहारा ..

पाहरा चुकवुन ज स्वप्न दोळा साठलेले
भेटण्या आभाळ माझ्या पापणिला दाटलेले

स्वप्न माजे चंद्र झाले .. अन आभाळा भेटले
स्पर्श त्याचा साहतना चांदणे हे विखुरले ..!!

FRIENDSHIP






♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
❤๑๑……. , . – . – , _ , ……………………………………………..๑๑❤
❤๑๑……. ) ` – . .> ‘ `( …….. FRIENDSHIP ………………….๑๑❤
❤๑๑…… / . . . .`\ . . \ …………………………………………….๑๑❤
❤๑๑…… |. . . . . |. . .| ….. IS LIKE A FLOWER ; …………..๑๑❤
❤๑๑……. \ . . . ./ . ./ ………………………………………………๑๑❤
❤๑๑……… `=(\ /.=` …. GROWING IN ITS GLORY , ……..๑๑❤
❤๑๑……….. `-;`.-’ ………………………………………………..๑๑❤
❤๑๑…………. `)| … , .. TELLING ITS OWN STORY ; ……..๑๑❤
❤๑๑…………… || _.-’| …………………………………………….๑๑❤
❤๑๑………… ,_|| \_,/ .. FRIENDSHIP IS PRECIOUS ……..๑๑❤
❤๑๑…… , ….. \|| .’ ………………………………………………..๑๑❤
❤๑๑….. |\ |\ ,. ||/ ……….. NOT ONLY IN SHADE , ………..๑๑❤
❤๑๑. ,..\` | /|.,|Y\, ………………………………………………..๑๑❤
❤๑๑… ‘-…’-._..\||/ …. BUT IN THE SUNSHINE OF LIFE …๑๑❤
❤๑๑……. >_.-`Y| ………………………………………………….๑๑❤
❤๑๑………… ,_|| …… THANKS FOR BEING MY FRIENDS .๑๑❤
❤๑๑………….. \|| …………………………………………………..๑๑❤
❤๑๑…………… || …………. MAY OUR FRIENDSHIP ……….๑๑❤
❤๑๑…………… || …………………………………………………..๑๑❤
❤๑๑…………… |/ …………… WILL EVERLASTING ………..๑๑❤.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

बायको माझी हरवली ..........



माझ ही एक स्वप्न आहे की, माझी ही एक सुंदर बयाको असावी,
म्हणून फावल्या वेळात, टाइम पास म्हणून,
माझ्या स्वप्नातील बायकोच चित्र काढल, नी घराच्या भिंतीवर टागल,
पण त्याच रात्री अशक्य अस शक्य झाल |
चित्रातिल त्या बायकोशी, माझ स्वप्नात लग्न झाल ||
स्वप्नातील या संसाराची, तुम्हा पुढे मांडतो व्यथा |
पहिली बायको हरवल्याची, तुम्हा सांगतो कथा ||
लग्ना पासून सुरु होती, माझी साडेसाती |
खडूस बायको या देवाने, मारली माझ्या माथी ||
घरातील सर्व मेम्बर वर, तीचा वचक असे फार |
जणू कर्ता धर्ती होती, हीच घराची सूत्र धार ||
तिच्या मनाच्या विरुद्ध, जर का गोष्ट कुठली झाली? |
कधी बने ती चंडिका, तर कधी महाकाली ||
छोट्या छोट्या गोष्टी वरुण, उगाच भांडत बसायची |
रागाच्या भरात मुलाना, मसाल्या सारखी कुठायची ||
व्रत वैफल्य उपवासा वर, तिची फार मदार असे |
दैव् निवैद दाखवत म्हणे, देवा हे तुझ्यावर उदार असे ||
देवाच्या डोक्यावर Zero चा बल्प, लावून ठेवी २४ तास |
पण घरो घरी सागत फिरे, भक्ती माझी आहे खास ||
अशा या बायको मुले जगण्याची, मजला नव्हती कसली आस |
माझ्याच घरात , माझ्याच बायकोच, मला होता सासुरवास ||
A K दिवशी थकून भागुन, कामावरून घरी आलो मी |
अन बायकोच नव रूप पाहून, अगदीच थक्क झालो मी || कारण..
चरणावर तिने नमस्कार केला | नी हाती पाण्याचा ग्लास दिला ||
बायकोच अस वागण पाहून, ब़र वाटल मनाला |
बायको माझी कशी बदलली, विचारू म्हटल कुणाला ||
आज पर्यंत रागा रागात, माझ्या पुढे जी मिरवली |
मनात म्हणालो खडूस बायको , नेमकी कुठे हरवली ||
जादू तिच्या वर केली कुणी, वाटल शोध घेवुया |
बायको जाते जिथे जिथे, तिच्या मागे जावुया || A K दिवशी लपत छपत, पाठलाग तिचा केला मी |
सत्संगाला ती जावून बसली, तिथला नजारा पाहीला मी ||
सदगुरूच्या त्या दरबारी, माता-भगीनी जमल्या होत्या |
काया वाच्या नी मनाने त्या, हरी कीर्तनात रमल्या होत्या ||
तिथ प्रभुच ज्ञान होत, सद भक्तीच वाण होत |
जगी प्रेमाने राहण्याच, सदगुरूच वरदान होत ||
आज पर्यंत खडूस, तापट, बायको म्हणून मी मिरवली |
मला समजल तीच बायको, या सत्संगात हरवली ||
पण नतरची नवी बायको, स्वभावाने होती छान |
कारण तिला सदगुरू कडून, मिळाले होते ब्रम्ह्यज्ञान ||
याच स्वप्नातील बायकोमुले, तुम्हा समोर आलो मी |
खर सागतो तिच्यामुले , स्वप्नात ही ब्रम्ह्ज्ञानी झालो मी ||

-: मिस कॉल - Miss Call :-



खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||

तुझ्या शिवाय


आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....

ONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे..

ONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे...
G - TALK वर माझ्या असा एक ping आला
भटकलेल्या वाटसरूला जसा नवा रस्ता मिळाला...

तास न तास वाट ती ONLINE येण्याची पाहायचो
तिच्याशी गप्पा मारताना वेगळ्याच दुनियेत मी जायचो...

महत्वाची कामे सारी बाजूला सरायची
सखी ONLINE आली कि शब्दांचीही कविता बनायची...

ऑफिसात धाव माझी तिच्याशी CHAT करण्यास असायची
ऑफिसच्या कामांना कसली हो घाई असायची...

दुखाची ओझी सारी कधी न जड वाटायची..
तिच्याशी ONLINE बोलताना हास्याची कळी गाली उमलायची...

तिला SMILEYS पाठवताना हुरहूर मनाला लागायची
वेडे मन माझे तिच्या SMILEY ची आतुरतेने वाट पहायची...

६ चे ठोके पडताच तिच्या OFFLINE जाण्याची भीती असायची...
रात्र तिच्याच विचारात घालवत ती ONLINE येण्याची वाट पहायची...

कधी ही न पाहिलेल्या व्यक्तीवर अशी प्रीत जडावी...
अशी ONLINE सखी अचानक काळजाला भिडावी...

INTERNET या अशी जादूची छडी फिरवली
स्वप्नांच्या दुनियेतील तिच्याशी ONLINE भेट घडवली...

सौंदर्यावर भूळूनी प्रेम करणारे..प्रेमी असे खूप आहे..
पण ONLINE प्रेम करणारा प्रेमी मात्र मीच आहे...प्रेमी मात्र मीच आहे

जोडी….



भांडल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांना
त्या दोघी म्हणजे .....
सासु आणि सुना

ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतार हसरे
ते दोघं म्हणजे .....
जावई आणि सासरे

एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जय
त्या दोघी म्हणजे .....
नणंद आणि भावजय

एकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवा
त्या दोघी म्हणजे .....
जावा - जावा

बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर
ते दोघं म्हणजे .....
वहिणी आणि दीर

या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात
ते दोघं म्हणजे .....
यशस्वी पती पत्नी

अप्सरा जवळ येऊन बसली

\

एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली

कोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले
भाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले

ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
जशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती

गाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा
अ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा

खाली होताच window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली

केस तिचे माझ्या चेहर्‍याशी खेळत होते
हृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते

सुवास तिच्या गजर्‍याचा म॑द येत होता
हळूहळू मला धु॑द करत होता

कसा गेला वेळ नाही कळले काही
न॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही

ऊतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर तिच्या माझे काळीज घेऊन गेली

अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीत तिचाच भास होतो

असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेल
भेटल्याभेटल्या पहिले propose तिला करून टाकेल
.

सांगता येत नव्हतं माझं प्रेम



अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम

मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम

सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम

वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेम
थांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेम
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम

स्वप्नांचे पान मुंबई………



स्वप्नांचे पुर्णत्व येथे


स्वप्नांचे पान मुंबई


तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई


वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई


मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई


प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई


लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई


नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई


लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई


क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई


भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई


व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई


ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई


कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई


जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई


मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई


महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई………

आकाशातील मी घन काळा


आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका
नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा
पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला 
प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी बरसून गेलो
आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जनम्न्यास पुन्श:छ नदीसागरात मग देह माझा विलीन झाला 
__._,

कोण येथे गुरुवर्य ?




कोण येथे गुरुवर्य ?खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य
भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य


__

माझी तू त्याची होताना



सांग ना सखे तूच आता


माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना


मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?


एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?


सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...

आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा ...
अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा...

....................................मन हे बेधुंद झाले
....................................बावरले .. हरवले ..
....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
....................................नयनात सामावले !!

....................................क्षण हे गोंधळलेले
....................................थोडेशे बावरलेले
....................................अंगणात हृद्याच्या
....................................नभ अवतरलेले !!

हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ...
चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची...
सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी...
अल्हाद मोहक निर्मळ... झुळुक स्वप्नांची ...

....................................शब्द अडखळलेले
....................................ओठात हरवलेले
....................................श्वासांच्या ठेक्यावरती
....................................ह्रद्यगीत झुललेले !!

....................................प्रितफुल गंधाळलेले
....................................सप्तसूर ओथंबलेले
....................................प्रितीची साथ घेवूनी
....................................ह्रद्य धडधडलेले !!

....................................मन हे बेधुंद झाले
....................................बावरले .. हरवले ..
....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
....................................नयनात सामावले !!

.

आई..मिटलेला श्वास -




पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या

ते वडाचे झाड वाळके
दोरा बोहताली करकच्च
स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस
भावना दाटलेल्या भरगच्च

आकाशात किंचाळते वीज
सुनसान मी भयभीत
स्मरणात तुझीया संपते
खोल हुंदक्यांची रात

रस्त्यात उभे वारुळ
मनाचे उडलेले डाग
स्वप्नपारंब्या खाली
निजते माझे विचारगाव

Thursday, June 16, 2011

रखवालदार ते 'सोनेरी' आमदार... रमेश वांजळे



रमेश वांजळे यांचे मूळ गाव अहिरे. गावातच त्यांचे लहानपण गेले. तीन भावंडांमधील वांजळे हे थोरले. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. त्य

ातच वडील सरपंच असल्याने राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी काही काळ तालीम केली. शरीरसौष्ठव चांगले असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांना रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीत त्यांनी काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली. परंतु ही नोकरी फार काळ टिकू शकली नाही. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रूपात राजकीय गुरू मिळाले. मोरे यांच्यासमवेत काम करीत त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि ते प्रथम अहिरे गावचे सरपंच झाले. या सरपंचपदातून त्यांनी राजकीय धडे घेत झेप घेतली. हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ते विजयी झाले. एवढेच नव्हे, तर पंचायत समितीचे उपसभापतिपद त्यांनी मिळविले. राजकीय वाटचालीत माघार घ्यायची नाही, ही त्यांची वृत्ती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वांजळे यांचा गट महिलांसाठी आरक्षित झाला. हा गट आरक्षित झाल्यावर त्यांनी आपली पत्नी हर्षदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या.

जिल्हा परिषदेत पत्नी निवडणूक आल्यावर त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करणे पसंत केले. याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे त्यांना अन्य पक्षांकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी 'राष्ट्रवादी'कडे उमेदवारी मागितली. पण 'राष्ट्रवादी'ने उमेदवारी दिली नाही; त्यानंतर भाजप-शिवसेनेकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडूनही तिकीट न मिळाल्याने वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळेपासून वांजळे हे हमखास आमदार होणार, अशी चर्चा सुरू झाली. प्रचाराची आगळीवेगळी पद्धत, गळ्यातील आठशे ग्रॅम सोने, कार्यर्कत्यांचे मोठे जाळे आणि उत्कृष्ट भाषणशैली यामुळे त्यांची मोठी छाप मतदारांवर पडली. एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायक भासावा अशी त्यांची यष्टी. डोळ्यांवर गॉगल, दाढी वाढलेली आणि अंगभर सोने यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. संत तुकारामांचे मुखोद्गत अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या ते भाषणात म्हणून दाखवीत आणि त्यांची छाप आणखी गडद होत गेली. त्यामुळे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना वांजळे दगडूशेठ मंदिरात बसून होते. निकाल कळाल्यावरच ते मंदिरातून बाहेर पडले.

अंगावर मिरविणाऱ्या सोन्यामुळे अगदी आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारापासूनच वांजळे चचेर्त राहिले होते. तमाम 'वृत्तवाहिन्यां'नी त्यांना गोल्डमॅनचा 'किताब' बहाल करून टाकला होता. विधिमंडळापासून कोणत्याही सभा-समारंभांमध्ये वांजळे उपस्थित झाले, की बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या अंगावरील सोने न्याहाळत. तसेच, त्यांच्यासमवेत छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे सरसावत.

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मात्र या 'गोल्डमॅन'चे विक्राळ रूप उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात 'मनसे'ने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विधिमंडळात पक्षाचे आमदार घोषणाबाजी करीत होते. त्या वेळी आझमी यांच्यासमोरील माईकचे पोडियम उखडून टाकतानाचे वांजळेही मराठी जनतेने पाहिले.

आमदार झाल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी वांजळे यांचा विजयी जल्लोष काही औरच होता. आपली पत्नी हर्षदा हिला चक्क उचलून त्यांनी आपली पहिलीवहिली आमदारकी साजरी केली होती. वांजळेंच्या या सेलिब्रेशनची खबर मिळताच उशिराने दाखल झालेले कॅमेरे-वाहिन्यांसाठी त्यांनी या जल्लोषाचा 'रीटेक'ही केला.

गेल्या काही दिवसांपासून 'आमदार आपल्या दारी' या योजनेच्या निमित्ताने ते आपला खडकवासला मतदारसंघ पिंजून काढत होते.

व्यवसायातून आर्थिकवृद्धी... काशीदर्शन यात्रा

रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मोठा दबदबा. लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध. त्यातूनच एनडीएमध्ये ज्यूसबार सुरू करण्यास त्यांना परवानगी मिळाली. हाच ज्यूसबार त्यांच्या उत्पन्नाचा व आथिर्क उन्नतीचा मोठा मार्ग ठरला. दररोज मंडईतून ट्रकभर फळे आणायची. त्याचा ज्यूस करायचा आणि एनडीएतील छात्रांना विकायचा. कित्येक वर्षे त्यांनी हा ज्यूसबारचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा लहान भाऊ शुक्राचार्य वांजळे आता हा ज्यूसबार सांभाळतो. या व्यवसायातून मिळालेला पैसा वांजळे यांनी जमिनीत गुंतविला. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून त्यांनी संपत्ती मिळविली. मात्र, ही संपत्ती घरात न ठेवता त्यांनी गरीब, शेतकरी व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना काशीयात्रा घडविण्याची योजना सुरू केली. त्यांनी स्वखर्चाने हजारो नागरिकांना काशीयात्रा घडविली; तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन, तर मुस्लिम समाजाला अजमेरची यात्रा त्यांनी घडविली

Friday, June 10, 2011

आठवतय.........????



आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,
आपण केलिली प्रेमाची साठवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...
आठवतय, आपण दोखे घरात एकत्र असताना,
त्या एकांतात मी तुझा घेतलेला चुंबन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
उजाड़ दिसत आहे माझ्या घरच आंगन...

आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,
ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझे आयुष्यच झाले आहे अता निर्जन...

आठवतय, मला जोराची भूक लागली असताना....
तू अगदी प्रेमाने भरवले होतेस मला जेवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
मी अता काहीही करत नाही कसले सेवन...

आठवतय, आपण दोखे खरेदी करत असताना,
आपले एकमेकांवर असलेले प्रेमच होते खरे धन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझ्याच नावाने साजरे करतो मी प्रत्येक सण...

आठवतय, मी माझ्या दुखात रडत असताना,
तू उघडलेस माझ्यासाथी आपल्या प्रेमाचे आलिंगन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
सुखात सुद्धा मी करत आहे स्वतःशीच भांडण...

आठवतय, आपण कुठे ही भेटत असताना...
फ़क्त प्रेमाचच बोलायचो आपण काही पण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझ ते बोलन संपल नाही आहे अजून पण....

आठवतय, आपले प्रेम कठिन परिस्थिति असताना,
दोखानी मिळून घेतले होते अमर प्रेमाचे प्रण....
तू आज माझ्या सोबत नसताना,
हताश होऊंन घेतले मी एका कोपरयाचे शरण...

आठवतय, आपण दोखे एकमेकाना भेटत असताना,
फ़क्त आपले प्रेम आणि दोखे आपण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
शत्रु वाटतात मला अता प्रत्तेक जन...

आठवतय, आपण दोखे लांब एकमेकांपासून असताना...
जगन कठिन झाले होते हे प्रेमाचे जीवन..
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझी आठवणच झाले आहे माझे सहजीवन...