Friday, May 27, 2011

चेहऱ्यावरच्या बटा मागे सरताना गालावरची लाली हळूच...



चेहऱ्यावरच्या बटा मागे सरताना
गालावरची लाली हळूच झाकताना
तुझी तारांबळ मला वेड लावते ग........

चारचौघातला चोरटा कटाक्ष
अन नजरेला नजर मिळाल्यावर
तुझे होणारे लाजाळूचे झाड
माझ्या हृदयात रुतून बसते.....

तरीही नकळत पापण्या झुकवून
देतेस माझ्या इशाऱ्याचे उत्तर
आणि हळूच इकडेतिकडे बघून
कोणी बघत नाही ना ते तुझं बघणं........

तुझा वेध घेणारी माझी नजर
इतरांच्या नकळत झेलताना
तुझी होणारी लडीवाळ कसरत
मनाला त्याची भुरळ पडते ग....

निसटत्या स्पर्शांसाठी कारण शोधत
सावधपणे रोमांच झाकताना
तुझा तो संकोच .. अरे देवा
काळजात घर करून बसतो....

हे सगळे तुझे विभ्रम आणि
तुझे ध्यानीमनी सगळीकडे असणे
हे गुपित दडवून ठेवताना
मन घायाळ होते ग......

Thursday, May 26, 2011

चेह~यावर रेशमी बटा रुळती का इतकी सुंदर दिसते ती?...



चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर दिसते ती

किति गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?

भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखिची का वाटते ती ?

नाहि जरी दोन शब्द बोललो मी
अनामीक ओढ का लावते ती?

खुप गुढ वागणे आहे तिचे जरी...
तरी मैत्रीण का आवडे मला ती?

Saturday, May 7, 2011

मनं माझ तुझसाठी वेडं का......?


मनं माझ तुझसाठी वेडं का......?

आज बरसत्या पावसासवे

हे भंयकर वादळ का ......?


आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न

आज असे तुटल का......?

तुझ्या प्रेमला मुकलोय तरी

तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ......?


पानावरच्या दवासारखी तुझी साथ

जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?

तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही

अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?


तु विसरलीस मला हे माहीत असुनही

माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?

भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं

हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?


तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही

माझ्या मनाचा कागद कोरा का......?

जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी

तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?


सगळे संपले असतानाही

तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?

नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या

माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?


आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला

आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?

तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही

हा जीव जायचा थांबला का......?


सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या

तुझ्या सवे जगायची इच्छा का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....


काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....
त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,
खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,
किती झाला त्रास तुमच्या जन्माचा........

नाही सोडले तिने इतरांसारखे नदीच्या किना-यावर,
घेऊनी कडेवर, खांदयावर,
शिकवल कस चालायच हया,आयुष्याच्या वाटेवर,
बोलली तु जा,आहे मी पाठीशी, या जीवनाच्या वाटेवर......

धरुनी हात , शिकवली अ-आ-ई पानावर,
केली मस्ती-आली सुस्ती तर चटके दिले या पाठीवर,
जरी चटके दिले तिने पाठीवर तरी , त्रास होतो तिलाच ,
आहे स्वप्न तिचे, माझ्या मुलाने नाव कोराव जगाच्या पाठीवर.....

पण,झालो आपण मोठे की फ़ुटतात शिंग-डोक्यावर,
नाही राहत आपल प्रेम आपल्या आई-वडिलांवर,
राहते ते फ़्कत आजुबाजुच्या आणि कालेजच्या मुलींवर,
लाज वाटते कोणी बोलेल तु फ़िरतो अजुन आई-वडिलांबरोबर,
पण,नाही त्रास होत त्या आईला या मुलाच्या वागण्यावर......

दिल लग्न लावुन,त्यांनी मला माझ्या निवडीवर,
वाटल,मला ते चुक आणि मी बरोबर या माझ्या निर्णयावर,
संसार करुनी दोघ जाऊ या सुरळीत जीवनावर,
पण,सगळ विसकटल जीवन ही माझ्या गणितावर.....

बाळा जातो तर जा,पण जा काळा-वेळेबरोबर,
पण,लक्ष नाही दिले मी तिच्या शब्दावर,
होतो,आता पश्चाताप केलेल्या क्रुत्यावर,
काय,फ़ायदा आता रडुनी तिच्या आठवणीवर,
काय,लिहु मी हया आईच्या मायेवर.....

फ़ुलपाखरु ते...!













अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले.
ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले.
दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो
हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले.
दिवस तो मग असाच
एक न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला.
फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते.
कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या.
नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही...

लक्षणं



हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
.
.
.

.
***कार्ट प्रेमात पड़लय*** :-D

आई फ़क्त तुझ्यासाठी.......



आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...

इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....

थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...

सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...

अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....

सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही ....

Thursday, May 5, 2011

माझी तू त्याची होताना



मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्षी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

माझ्या डोळ्यातील आसु अन
तुझ्या ओठांवरील हसु
यांचे साधर्म्य जाणताना
सांग ना सखे तुच आता
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?