Thursday, March 31, 2011

ती .......


                                              

कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली.
चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली.
काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं. पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती…
दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती.
मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो.
काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता. तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता.
तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता.
वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही.
वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.
नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो.
डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले.
ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला.
तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.
जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता.
मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं होतं..
माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते.
ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो..
माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते.
तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं. आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती.
मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो.
तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला.
आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती.
सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा………………………………..”


लेखक : अनिकेत


=========================================================

टीप :-  माझ्या वाचनात आलेलं सुदर काल्पनिक कथन


http://nirajdhane.blogspot.com/


                                            

........................ प्रेम वेल..........................


मी वेल लावली  होती प्रेमाची 
तू पाणी घालायला विसरलीस 
प्रेम फुल फुलण्याआधीच 
तू माझ्या प्रीतीला विसरलीस ...

गजरयात तुझ्या फुललेले ,
आपल्या प्रीतीचे फुल,
तुझ्या माझ्या प्रेमाची ,
बाग देतेय ते हि चाहूल ...

हृदयाची भाषा समाजावालीस तू ,
मनाच्या गाभार्यात डोकावलीस तू ,
तुझ्या माझ्या  हृदयाच्या तारा जुळल्या ,
अन नकळत माझ्या प्रेमात पडलीस तू ...

विसरेन विसरेन  म्हणता म्हणता,
तुझ्या आठवणीतच वेल निघून गेली ,
खरंच विसरलो तुला मी .... कि ,
माझ्या हृदयानी माझीच गम्मत केली ...

खोडलेस जरी लिहिता लिहिता ,
नाव तुझ्या हृदयातून,
किती लापवाशील त्याला ,
माझ्या नावापासून ...

मी पण शिकतोय आता ,
तुझ्या सारख वागायला,
मनात आठवणी लपवून ,
ओठावर हसू आणायला ...

                                    

Wednesday, March 30, 2011

पहिला दिवस...!!!


अजूनही आठवतोय मला तो पहिला दिवस...!
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..!
तिला भेटण्याच्या अतुर्तेमध्ये मला त्या
आदल्या रात्री झोओप आली नाही
कधी एकदाची ती रात्र संपते... आणि
सकाळ होते.. आणि कधी एकदाचा
मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, अघोळ केली..!
फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण,
स्वच असा ड्रेस मी घातलेला होता..!
केस व्यवसित करून तयार झालो.
आदल्या दिवशी मित्राकडून,
आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी,
माझ्या कपड्यावर ओतली.
तेवढ्यातच आई ने आवाज दिला,
नाश्ता तयार आहे खावून जा.,
आईला मला नाश्ता नको असे,
बोलत मी खिशामध्ये हाथ घातला,
बघतो तर काय माझाकडे,
फक्त २ नच रुपये होते,
मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी ,
५०रुप्ये मागितले तर तिने नकार दिला,
मी तसाच निराश होवून निघालो,
जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील,
एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले.
कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी,
आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो.
तिला भेटण्याचा एक एक क्षण,
जवळ जवळ येत होता तस-तशी,
माझा मनातली भीती वाढतच जात होती,
पण आज मी निचय करूनच आलो होतो की,
आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही.
सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली,
नि माझा समोर येवून उभी राहिली.
मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो,
तिने पण मला गुड मोर्निंग केले.
तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले,
नंतर मी तिला बोललो ,
मला तुला काही तरी सांगायचे आहे,
ती लाजत लाजत बोली "बोल"
मी डोळे मिटून धीर धरून तिला
आय लव यु ...! म्हटलं.
तसं तिने खाली वाकून sandal,
पकडणार एवढ्यातच मी तीचापासून,
दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा,
राहिलो पण ती sandal ची पट्टी लावत ,
मला सेम टु यु...!!! म्हणाली.............

माझ्या वाचनात आलेली सुंदर कविता ...

::::::::प्रियेशी:::::::



प्रियेशी असावी अशी ..
मनात एक इछ्या आहे ....
कोणीतरी प्रियेशी असावी ...
थोडीशी भाऊक काहीशी विनोदी ...
नि : स्वार्थ प्रेम करणारी..
रंग रूप काही हि असो ..
भांडखोर मात्र नसावी .......
हुशार भोळी कशीही असो ....
सुसंस्कृत मात्र असावी .......
गरीब श्रीमत कोणी हि असो .....
गर्विष्ठ ती नसावी.......
धडधाकट नसली तरी चालेल......
पण दुख समजणारी असावी...
नम्र स्वभावाची सुशील वर्तनाची .....
प्रेमळ स्वभावाची असावी .....
आणि प्रेम हे निस्वार्थी प्रेम असते ..
हे जाणणारी असावी ....................
अशी एखादी प्रियेशी असावी..........





Hello,

Good Morning.......


===================================================
Regards,
Niraj H. Dhane.

Tuesday, March 29, 2011

::::::भास:::::::



आता तरी कळू दे ,
तुझेच भास सारे,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे.

तो रंग शारदेचा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे.

कोणास काय सांगू
मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे..

आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे.

Friday, March 25, 2011

नुसताच बसलो होतो मी बराच वेळ हातात कागद-पेन...

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं


ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

आयुष्यातील खेळ पत्यांचा......


मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा

Thursday, March 24, 2011

कुठेतरी...कोणीतरी फक्त आपलंच माणूस असेल


कुठेतरी...कोणीतरी फक्त आपलंच माणूस असेल .
जे येता समोर धडकणाऱ्या हृदयाचा ठोका चुकेल..

शब्दाविना तो सारे मनातले बोल उमजेल ..
चेहऱ्यावरची माझ्या रेघ अन रेघ अचूक टीपेल.

पाहताच त्याला गालावरची लाली खुलेल.
झुकलेल्या पापण्याआड नजर भिरभिरेल.

मोबाईल वर तो तासन तास कुजबुज करेल.
एसेमेस पाठवून मला सतत गुंतवून ठेवेल.

कधी खोडसाळ चिडवून बेजार करेल;
तर कधी रुसवा घालवून हसू फुलवेल.

प्रत्येक कसोटीच्या क्षणी खंबीर साथ देईल;
आयुष्यात माझ्या सुखाची बरसात करील.

असा हा माझा जीवनसाथी फक्त माझाच असेल.
ज्याची सुरेल संगत सर्व ऋतूत प्राणप्रिय असेल.

* **** ***

:::::::नाही विसरू शकत मी तुला:::::::::



नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...

पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....

सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....

चांदण्या हासतात... चंद्र खुणावातो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...

कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच पचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...

नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना



पाणी-पुरी..


एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!!!
=====================

www.nirajdhane.blogspot.com

मी शिकावं शिकावं ,नि खूप मोठ व्हाव


मी शिकावं शिकावं ,
नि खूप मोठ व्हाव ,
मनी बाळगून हे सपान ,
त्या काळीत राबणारी ,
माय तूच होतीस ना !,

मी चमकाव चमकाव,
त्या सूर्याच्या समान ,
त्या कडाडत्या उन्हात ,
राबणारी वाघिणी,
माय तूच होतीस ना !,

मी रहाव नेहमी,
त्या गार गार सावलीत ,
अंगार मातीत त्या ,
अनवाणी राबणारी,
माय तूच होतीस ना !,

सुख माझिया जीवनी ,
राहावे नेहमी नेहमी ,
उरी बाळगून हे सपान ,
दुख जन्मभर सोसणारी,
माय तूच होतीस ना !,

काटा रूतता या पायात,
अश्रू उभे तुझ्या डोळ्यात,
मजसाठी दररोज,
त्या काट्यातन चालणारी ,
माय तूच होतीस ना !,
========================

Tuesday, March 22, 2011

शिव छत्रपतीची कीर्ती

शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।
येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।
मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥
चौक १
एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, "चल बाळा । जाऊ दरबाराला ॥
जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।
बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा" ॥
"चला, बाबा !" बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।
पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।
शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । कारंजे केले ।
तुषार उडविले । इंद्रधनुष्यांनीं कमान जिथं केली ! ।
अशी शोभा जिथं रंगली । आस भंगली । तिथंच, बघा आली ।
शिउला ओकारी !! ॥ सोन्याच्या फुलांचा सडा । कुबरे जिथं खडा ।
वाद्य झडझडा । झडति जिथं रंग आला नाचाला । जिथं प्राणीमात्र रंगला ।
तिथं शिवबाला कसा वीट आला । ठावं कोणाला !! ॥ तंव शहाजी बोले शहाला ।
"शिवबाळ आला । आपल्या भेटीला । कर रे बाळा ! कुर्निसात मानाचा । हा घ्यावा मुजरा
चाल
पोराचा । बंदा हुकमाचा । मुलगा हा आमुचा" ॥
शिवबाळ बोलला बापाला । "नमावं देवाला ।
नमावं तुम्हांला । नमणार नाहीं कधीं पण याला ।
अपमान झाला । राग मज आला ! ॥
हा ’बंदा’ नाहीं शाहाचा । बंदा रामाचा ।
पठया मानाचा । नमणार मान नाहीं कधीं याला ॥
राहवेना बाबा ! हो मला । जातो मी घरा । आतां या वेळा " ! ॥
चाल
असं म्हणून दरबारात्नंा बाळ थेट चालला ! ॥
जसा छावा सिंहाचा नाहीं ठाव भीतिला ! ॥
रस्त्यानं त्याअ वेळेला । एक ब्राह्मण नेई गाईला ।
तिचं वासरुं होतं पाठीला । येक खाटिक सुरा घेऊन मागं लागला ॥
’जब करतो गाय’ बोलला । पाणी गाईच्या हो डोळ्याला ।
झाली कावरीबावरी त्या वेळा । हंबरडा फोडूं लागली, लागली कांपायाला !! ॥
हजारों लोक बाजूला । पर बघा कोण पुढं आला ? । शिवबाळ वेगानं आला ।
अन् खाटकाचा हात उडविला । सारा लोक थक्क जाहला ! ।
कुजबुजती एकमेकाला । "आतां काय होईल ठाव देवा ! कोणाला" !! ।
शिवबाळ घरीं परतला । पर् त्याचा निर्धार झाला ।
"हिंदवीराज्य" करण्याचा हिय्या घेतला !! ॥१॥

शिवाजी महाराज

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू

अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी

परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी

तयाचे गुण महत्वासी | तुळणा कैची

नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळ पति

पुरंदर आणि शक्ती | पृष्टभागी

यशवंत, किर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत

पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा

आचारशील विचारशील | दानशील धर्मशील

सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठायी

धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर

सावधपणे नृपवर | तुच्छ केले

तीर्थक्षेत्रे मोडिली | ब्राम्हण्स्थाने भ्रष्ट झाली

सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला

देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण

हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली

उदंड पंडित पुराणिक | कवीश्वर याज्ञिक वैदिक

धूर्त तार्किक सभानायक | तुमच्या ठायी

या भू मंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही

महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे

आणिकही धर्मकृत्ये चालती | आश्रित होउन कित्येक राहती

धन्य धन्य तुमची कीर्ती | विश्वी विस्तारली

कित्येक दुष्ट संहारिले | कित्येकासी धाक सुटले

कित्येकासी आश्रय जाहले | शिवकल्याण राजा

तुमचे देशी वास्तव्य केले | परंतु वर्तमान नाही घेतले

ऋणानुबंधे विस्मरण जाहले | काय नेणो

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती

धर्मसंस्थापनेची कीर्ती | सांभाळली पाहिजे

उदंड राजकारण तटले | तेणे चित्त विभागले

प्रसंग नसता लिहीले | क्षमा केली पाहिजे

-समर्थ रामदास स्वामी

::::छत्रपती शिवाजी महाराज जयंती ::::



"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
आजच्या या पावन दिनी जिजाऊ.कॉम तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

"शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !

खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड, शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!

शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

============================================

NiRaJ DhAnE.


Monday, March 14, 2011

.................तो बाप असतो.




बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
............ ........तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
............ ......... ......... ....तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
............ ......... ......... ..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
............ ......... ......... .....तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
............ ......... ......... ......तो बाप असतो

lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
............ ....तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
............ ..तो बाप असतो.

=


Saturday, March 12, 2011

एक विनंती आहे .....



एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायचच असेल
तर वेळच देऊ नका......

एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........

एक विनंती आहे .....
चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा
कंटाळाच येणार असेल तर कोणाला नंबर च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका.......

एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
secrets share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका.....

एक विनंती आहे .....
माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका ,
अनोळखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जाणुन घेऊ नका ....

एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....

एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ........! 

"निर्लज्ज व्हा सुखी व्हाल".



घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन
कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला
काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार
उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली
तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो.
नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते,
ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी
फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही
किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले
ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर
होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून
दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt
+ Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी.
फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत.
बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात...
मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने
पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे
किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून
८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार
होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला
येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच
ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या
भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे
की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या
कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे
आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८
जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस
आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या
डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण
नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा
चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या
गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो
तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली".
तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस
येतात.)

घटना १ समाप्त

बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे
जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला
गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच
महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा".

धन्यवाद

बाबा मला का दिला देवाने रंग हा सावळा ?



एक लहान लेकरू त्याच्या काळ्या सावळ्या रंगामुळे, त्याला चीडवलेल्या शब्दांमुळे कंटाळून बाबांना प्रश्न विचारतंय.
बाबा मला का दिला देवाने रंग हा सावळा ?
हिणवी सारे जण म्हणतात हो कावळा.

आता बाबा लेकराला कसं उत्तर देतात ते पहा.

आहेस जशी तू तशी आवडे आम्हाला,
का ग भूळलीस तू त्या गोरया रंगाला.

काळा कुट्ट ग कावळा त्याचे नाव ऐसे घ्यावे,
पूर्वजांची होती माया म्हणुनी जेवू त्यांना द्यावे.

मग विचार मनाला तुझा रंग तरी कैसा,
बघ मनही म्हणेल तू वागशील तैसा.

काय वाईट आहे का काळा सावळा हा रंग,
साऱ्या ह्याच भांडणात होई जातीची ग जंग.

काळ्या रंगानेही केली साऱ्या जगावर मात,
घेतली बुद्धीच्या जोराने थोपटून आपली पाठ.

काळ्या सावळ्या रंगाची बघ झाली किती गाणी,
या रंगाची महती गीतकार सुद्धा जाणी.

कोणी ओळखता यावे देवाने रंग मारीयला,
गोरया रंगाचे ग श्रेष्ठ लोकांनी अर्थ लावियला.

देवाचा देव कृष्ण तोही बघ काळा,
सोळा सहस्त्र बायका घाली त्याला कि ग माळा.

निळे पांढरे आकाश तेही होते बघ काळे,
काळ्या रंगाची ती किमया दिसती पावसाळे.

एकमेकांत मिळूनी बनतात रंग सारे,
मग आपल्यात का भेदभाव हा असा रे.

हे खास कवी रसिकांसाठी.......
वाटे मज आता तुम्ही आहात हो रंग,
बघा रंग हे वेगळे झाले कवितेत दंग.
कविता ऐकुनी करती बात आपसात,
सारे सावळ्या कवीची कविता ऐकतात


Friday, March 11, 2011

प्रत्येकवेळी वाट पाहत तुझी मी






प्रत्येकवेळी वाट पाहत तुझी मी
कितीतरी वेळ थामबयाचे....
तू जरी उशिरा आलास तरी 
मी हसतमुखाने तुझे स्वागत करायचे 
खर सांगायचे तर तू उद्या भेटशील म्हणून 
मी रात्र रात्र जागले........
.... सांग ना मी काय चुकीचे वागले?

भेटल्यावर हि तुला घाई परत जाण्याची 
माझी मात्र धडपड स्वहतालच
समजाविण्याची...
काम असेल त्याला? लवकर जा तू 
तुला निरोप देताना मी अश्रू माझे लपवयाचे....
तरीही मी तुझ्यावर कधीच नाही वैतागले....
सांग ना मी काय चुकीचे वागले? अरे वाटत मला तू नेहमी सोबत राहाव 
तुला भेटण्याची मला गरज नसावी....
मग एक दिवस मला उशीर झाला म्हणून 
तू चार दिवस रुसून बसाव..........
त्या तुझ्या विरह वणव्यात मी एकटीच पेटले...
.........सांग ना मी काय चुकीचे वागले?

आज मात्र तू वेळेवर आलास 
मला वाटल तुझ्यावर माझ्या प्रेमाची जादू झाली...
हातात हात घेवून माझा तुझ माझ आता जमणार नाही 
म्हणत तू क्षणात नाहीसा झालास..............
मस्करी केली तुझी म्हणशील आणि परत तू येशील 
म्हणून मी तुझी वाट पाहत राहिले....... 
सांग ना मी काय चुकीचे वागले?

*आइस्क्रीम *



 
प्रसंग लहानसाच, पण हृदयस्पर्शी आठवणी जागवणारा! 
असाच एका संध्याकाळी पार्कमध्ये एकटाच बसलो होतो. मुलं खेळत होती. त्यांचे 
आईवडील जी काय हिरवळ बागेत होती त्यावर बसले होते. मुलं शहाण्यासारखी सीसॉ, 
घसरगुंडी, झोपाळा, यासाठी लाइन लावून उभी होती. 
जरा एका बाजूला एक आइस्क्रीमवाला होता. त्याच्याभोवती मुलं नी त्यांचा हट्ट 
पुरवणारे पालक होते. आइस्क्रीम खाणारी मुलं आइस्क्रीमवाल्याच्या गर्दीपासून 
थोडी लांब उभी राहून आइस्क्रीम खात होती. त्यातल्या एका मुलानी आपलं आइस्क्रीम 
संपल्यावर दुसऱ्या आइस्क्रीमसाठी आपल्या वडलांकडे मागणी केली. बापलेक आर्थिक 
सुस्थितीत असल्याचं त्यांच्या पेहरावावरून दिसत होतं. बहुधा पार्कबाहेर त्यांची 
गाडी उभी असावी असं वाटत होतं.
थोड्या अंतरावर दुसरा मुलगा आपलं आइस्क्रीम संपवत होता. त्याच्याबरोबर त्याची 
आई होती. दोघांच्या पेहरावावरून त्यांची परिस्थिति बेताची असावी हे कळत होतं. 
मुलाला बरोबर घेऊन त्याचे वडील पुन्हा आइस्क्रीमवाल्याकडे निघाले. आईबरोबरच्या 
मुलानी ते पाहिलं नि त्यालाही आणखी एक आइस्क्रीम हवंसं वाटायला लागलं. "आता 
नाही, पुरे आता" म्हणत ती त्याला दूर घेऊन जायला लागली. तिच्या आजच्या मजा 
करण्याच्या बजेटमध्ये ते बसत नसावं. तिचा मुलगा वडलांबरोबर आइस्क्रीमवाल्याकडे 
जाणाऱ्या मुलाकडे बोट दाखवून कुरकुरत होता. <
मुलाबरोबरच्या वडलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यानीही आपल्या मुलाला 
आइस्क्रीमसाठी नाही म्हंटलं नि ते त्याला आइस्क्रीमवाल्यापासून लांब नेऊ लागले. 
आईनी आपल्या मुलाला ते दाखवलं. मुलाची समजूत पटली नाही. पण आपल्याकडे मुद्दा 
राह्यला नाही हे त्याच्या लक्षात आलं.
माझ्यापासून थोड्याच अंतरावर हा प्रकार घडला होता. ओळखीची पर्वा न करता मी त्या 
मुलाच्या वडलांना गाठलं. आपणहून स्वतःची ओळख करून दिली. त्यांची ओळख विचारली. 
आम्ही बोलण्यात गुंतलो हे पाह्यलं नि मुलगा सटकला नि इतर मुलांत मिसळला. मी 
त्याच्या वडलांना विचारलं,
"तुम्ही मुलाला दुसरं आइस्क्रीम देणार होतात मग मागे का फिरलात?" 
"म्हणजे? " ते गोंधळले. त्यांना माझा प्रश्न अनपेक्षित असावा. मी त्याना 
पाह्यलेला सर्व प्रकार सांगितला.
ते हसले नि म्हणाले, "अहो, त्या बाईंचा मुलगाही याचं पाहून हट्ट करायला लागला 
होता. तिच्याकडे त्यासाठी पैसे नसावेत असं वाटलं". 
"त्या बाई तुमच्या ओळखीतल्या आहेत? "  
"नाही. ओळखीतल्या असत्या तर माझ्याबरोबर त्यांच्याही मुलाला मी आइस्क्रीम घेऊन 
दिलं असतं. "  
"ओळखीच्या नव्हत्या तरी तुम्ही त्यांचा विचार केलात? " 
"हो. त्याचं काय आहे काका" आमच्या वयातलं अंतर लक्षात घेऊन ते म्हणाले, "मुलं 
हट्ट करतात. त्याना आपल्या आईवडलांची परिस्थिती माहीत नसते. फक्त दुसऱ्या 
मुलाना मिळतं ते आपल्यालाही मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. पण त्यामुळे जे 
आईवडील ती पूर्ण करू शकत नाहीत त्यांची सार्वजनिक ठिकाणी गोची होते. त्यांना 
आपण इतरांसमोर उघडे पडतो म्हणून ओशाळलं वाटतं. मला त्या बाईच्या चेहऱ्यावर ते 
स्पष्ट दिसत होतं. तिला त्यातून सोडवायला दोनच पर्याय होते. एकतर माझ्या 
मुलाबरोबर तिच्याही मुलाला आइस्क्रीम देणं किंवा माझ्या मुलालाच आइस्क्रीम 
नाकारणं. पहिल्या पर्यायानी ती ज्यास्तच ओशाळली असती. म्हणून मी दुसरा पर्याय 
निवडला." 
"पण तुमच्या मुलाला वाईट वाटलं असेल... "  
"त्याची भरपाई मी नंतर करू शकतो. एव्हाना तो ते विसरलाही असेल. पण त्यावेळी एका 
आईची मुलाच्या निरागस हट्टामुळे जी अवस्था झाली होती त्यातून तिला सोडवणं मला 
ज्यास्त आवश्यक वाटलं. "
"तुम्ही दुसऱ्यांचं मन जाणता असं दिसतं. " मी कौतुकानी म्हणालो. 
माझ्या प्रशंसेमुळे ते जरासे संकोचले नि काहीशा गंभीरपणी म्हणाले, "अहो मीही 
लहानपणी खूप हट्ट करायचो. एक दिवस माझ्या लक्षात आलं की आपल्या हट्टामुळे 
आपल्या आईवडलांची चारचौघात ऑकवर्ड पोझिशन होते. त्या बाईंकडे पाह्यल्यावर मला 
त्याची आठवण झाली. "  
त्यानी आपल्या मुलाला हाक मारली. "चला निघतो. बाय" म्हणून त्यानी निरोप घेतला. 
ते गेल्यावर मलाही एक प्रसंग आठवला. आमची मुलं लहान असताना आम्ही सर्व नातेवाईक 
मिळून एकदा पिकनिकला गेलो होतो. आमच्यापैकी काहीशा सुस्थितीत असलेल्या एका 
नातेवाईकानी मी सर्वाना आइस्क्रीम द्यावं म्हणून आग्रह धरला. एकूण माणसं नि 
खिशातले मोजके पैसे याचा अंदाज घेऊन मी भीतभीतच हो म्हंटलं. दुकानात गेल्यावर 
हा नातेवाईक सर्वाना आग्रह करकरून आइस्क्रीम देत होता. प्रत्येक वाढत्या 
आइस्क्रीमबरोबर माझ्या काळजाचे ठोके वाढत होते. माझ्या एका बाजूला माझी दोन्ही 
मुलं उभी होती. हट्ट करण्याच्याच वयातली पण त्यावेळी काहीच मागत नव्हती. माझं 
लक्ष त्यांच्याकडे गेलं. मोठा धाकट्याला हळू आवाजात "ए, आपण आइस्क्रीम नाही 
घ्यायचं. बाबांकडे पैसे नाहीत. " म्हणाल्याचं मला स्पष्ट ऐकू आलं. 

भेटीचे प्रेमांतर ........


छान एका बागेत भेटण्याचे ठरले.

मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता

नाक मुरडले.

जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती

आज चक्क सलवार घालून आली होती

बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती   

अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले

तू कुठे गेला होतास?रागातच तिचे विचारणे 

आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास 

कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास

चल बसुया आत

भलताच दिसतोय वेगात


तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या

डोळ्यावर भिरकावत विचारले......

तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?

हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण

असा कसा रे तू अनरोमांटिक

अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक

रागाने उठून गेली ती तरातरा

मीही तिच्या मागे गेलो भराभरा

हातात घेउनी तिचा हात

म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज

कसला चढलाय तुझ्या रुपाला साज

बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......


आवडते मला तुझे रागावणे 

काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे

नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे

देशील का मला माझे हवे ते मागणे

काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे 

गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे

हवा आहे तुझा मखमली स्पर्श

वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष

लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली

तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली   

चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली

रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली.....