Monday, February 28, 2011

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला

तुझ्या आठवणी...


तुझ्या आठवणी...
तुझ्या आठवणी चांदण्या रातीत
वाऱ्याच्या झुळूक होऊन येतात
अन माझ्या शरीराला
हळुवार स्पर्शुनी जातात!१!

देतात मज श्रवणीय गुज
तुझ्या अस्तित्वाची
अन साद देतेय रात्र
तुझ्या माझ्या प्रीतीची!२!

प्रीतीच्या थंडीत आज मन
जास्तच कुडकुडतय
तेवढ जास्तच आज तुझ्या
मिठीत यावस वाटतंय!३!

मिठी माझी पाहून
चंद्राची कोर झाली
अन रात्रीने काजळ लावताच
तुझ्या गालावर खळी पडली!४!

तुझ्या अजाणत्या खळीत
स्वताला हरवावसं वाटतंय
अन विखुरलेल्या केसांच्या बटात
स्वताला गुंतवावसं वाटतंय!५!

हरपिलो भान मी
तुझेही डोळे बंद
जणू मोहरूनी गेला
इथला सगळा आसमंद!६!

तळपली वीज तारुण्याची
क्षणार्धात कोसळली
दोन जीवाला एकजीव
करूनच शांत झाली!७!

तुझ्या आठवणी... 
Logged
  

आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक


आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक
आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक

सरे प्रहर आपल शहर गर्दीचा कहर ,
त्या गर्दित तू माला आणि मी तुला शोधयचो
शोधता शोधता आपणच मग हरवायचो ,
एकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरयाचो
जसे एकाच ट्रेन मधे वेगळ्या डब्ब्यात शिरायचो
अधून मधून दूर जायची आपली सवय तिथलीच
तुझ गाव कुठल आणि तुझी पायवाट कुठली
एकमेकांशी उगाच अशी चेष्ठा करायचो
गोंधललेले चेहरे आपले हसत हसत पहायचे
तीच चेष्ठा खरी होइल कधीच वाटल नव्हत
गर्दित तेव्हा डोळ्यात कधी पानी दाट्ल होत
आता वय निघून चाललय हलक्या हलक्या पावलानी
त्यात माला वेड्लय पुन्हा तुझ्या जुन्या सावलीनी
एक एक सावलीत माला उनासारख सार लख्ख आठवतय
एकटयामध्ये उठवून माला गर्दित कोणी पाठवतय

मी उठून येन ही ,मागे वलुन पहिन ही ,मलाच शोधत राहीन ही ,गर्दित हरवून जाईंन ही .

तुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक
तुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक

आलीस तरी तुला सगळ आठवेल की नाही कुणाच

आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक
आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक

न तुला कळले,न मला उमगले...



   ऋणानुबंध हे आपल्यातले,  
   न तुला कळले,न मला उमगले...       

   डोळ्यात तुझ्या माझे हरवने,
   आणि मग तुझ्या हसण्या-बोलण्यात सापडने, 
   न तुला कळले,न मला उमगले... 

   माझ्या शब्दात तुझे मिसळने,
   आणि मग उगी स्वतहाला सावराने,
   न तुला कळले,न मला उमगले...

   माझ्या शब्दात तुझे मिसळने,
   आणि मग उगी स्वतहाला सावराने,
   न तुला कळले,न मला उमगले... 

   छंद हा आहेच निराळा,
   एक-मेकांशिवाय न कोना करमले, 
   पण हे तर,
   न तुला कळले,न मला उमगले... 

तुला कळले नाही ..


=============================
मन माझे आजुन ही तुला कळले नाही
खुप प्रयत्न केला पण सुर काही जुळले नाही
लिहिले काव्य बनविल्या कविता
तुझ्यासाठीच होत्या सार्या
पण तुला हे समजले नाही
खुप धडपडलो स्वतावर चिड्लो
काय सांगू कोण कोणत्या आफतित पडलो
पण सत्य काही तुला उमगले नाही
मन माझे आजुन ही तुला कळले नाही
खुप झाले आता मनाला समजविले आहे
भाग बाबा खुप आश्रू ढाळले आता
तुझ्यासाठी अश्रू कधी धालायाचे नाही !
किती काळ गेला माझा फक्त तुझ्या प्रतीक्षेत
आता मात्र तुझ्यामागे असा पलायाचे नाही !

( * **** *** )

================================

http://www.nirajdhane.blogspot.com/

तुला वेळ मिळाला तर...

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं,
मी समोरुन जाताना
तु दारात उभं रहायचं
आईला संशय नको म्हणुन
झाडानां पाणी घालायचं,
फुलानां फुलवायचं,
आईला भुलवायचं

तुला वेळ मिळाला तर...
को~या कागदावर्,
किवा रुमालावर
मन मोकळ करायचं
अस् एकमेकांनी
काळजात जपायचं

तुला वेळ मिळाला तर...

कळेल एक दिवस तुझ्या घरी
कळेल एक दिवस माझ्या घरी
तेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाची
दोघांत एक विषाची बाटली
तु आधी कि, मी आधी
असं नाही भांडायचं
दोघांनी एक-एक घोट घ्यायचं
हातात हात घेउन झोपी जायायचं

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.

मजेशीर मराठी


मजेशीर मराठी
फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाहीते 'पावन खिंडीतलढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचलेआता मेलात तरी चालेल.
(
फोन बंद)
हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा
*********************************************************************************************
MARATHI FUNNY QUESTION & ANSWER
प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्यागांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारतेम्हणून.
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (- ओळीतमाहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होतेत्यांचे नाव तुकाराम होतेलोक त्यांना संत तुकाराम म्हणूनओळखत.
------------------------------

प्रश्न - कारणे द्याउन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावतेउन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवसप्रसरण पावून मोठा होतोतर थंडीत त्याउलट लहान होतो.
खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तरग्लास काळा होईल.
मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं 
चिमण्या झाडावर चहा पितात
*********************************************************************************************
*********************************************************************************************
मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करतानाम्हणाले...
'
मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षाखुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..
द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटीतुम्हालाच मिळणार आहेत..
*********************************************************************************************
  
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????
कसे ते पाहा.
एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरेमी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.
ती काल आपल्याकडे आली नव्हतीअसंच 20 ही जणी सांगतात.

after 10 days..........

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.
तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.
त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्यांच्याच घरी होता.

and and and

उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात

Wednesday, February 23, 2011

शेवटची भेट....


शेवटची भेट....
====================
तुला भेटणार म्हणून,
घेऊन आलो मी प्रेम भेट,
पण मला काय माहीत,
ती होती आपली शेवटची भेट....

नेहमी सारखेच फ़िरत होतो स्वच्छंद,
तेव्हाही आठवत होता तू दिलेला गुलकंद...
चव येत होती त्या गुलाबाची थेट,
पण ती होती आपली शेवटची भेट....

बोलत होतीस तू तुझ्या मनातल्या भावना,
मंत्र मुग्ध होऊन मीही स्पर्शत होतो त्यांना,
तुझ्या ओठातून पोहचत होत्या थेट,
पण ती होती आपली शेवटची भेट....

तुझा तो अबोला अजुनही,
काळजात उतरतो थेट,
अशी होती आपली,
शेवटची भेट...
.