१) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
२) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
३ ) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
४ ) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
५ ) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
६ ) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
७ ) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
८ ) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
९ ) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
१० ) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
११ ) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
१२ ) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
१३ ) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
१४ ) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
१५ ) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
No comments:
Post a Comment