Friday, January 14, 2011

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???


Engg engg म्हणजे नक्की काय असतं???
pass out होणार्याला एकदम easy असतं.
suffer करणार्याला मात्र डोंगराएवढ ओझ असतं,
तरीही तुम्हा आम्हाला न सुटलेल कोडं असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असत???
सुरुवातीला distinction मिळ्वण्याच स्वप्न असतं.
पण हळुहळु झिरपत जावून,
४० मिळवण्यावरच ठेपलेल असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???
एटीकेटी मिळ्वणर्याला ते थोड हायस असतं.
All clear म्हणजे मरण्याआधी अमृतासारख असत,
Y. D. वाल्यांना पायाखालची जमीन हरपल्यासारख असतं,
critical असणार्याना तर टांगत्या तलवारीसारख असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं ?
Write ups म्हणजे सारं काही असतं,
पण तेही लेखपालासारख उतरवलेल असतं.
Completion म्हणजे डोक्यावरच ओझ खांद्यावर असतं,
रात्र-रात्र जागून केलेल ते एक decoration असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???
PL मध्ये अभ्यास करणार्याला ते ठावुक असतं,
Concept समजण्याआधी रट्टा मारलेल ते एक पारायण असतं,
तर न समजता पेपरमधे उतरवलेल ते एक व्याख्यान असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???
७५% attendance च्यामागे पळत असलेल कासव असतं,
तर defaulter मध्ये आल्यावर
पळ काढन्यासाठी reason enough असतं,
attendance मिळाल्यावर मात्र आभाळ पुरेसं असतं.

Engg engg म्हणजे नक्की काय असतं???
४ वर्षे पूर्ण झाल्यावर,
काय शिकलो हा अनुत्तरित प्रश्न असतो.
तर campus मधून place झालेल्या बुडत्यांना काडीचा आधार असतो.
.
.
.
.
.
.
असं हे Engg नामांकित पण भेदरलेल पिल्लू असतं

No comments:

Post a Comment