Tuesday, February 1, 2011

जेव्हा ती मला पहाते



जेव्हा ती मला पहाते

वीज चमकते, मेघ गरजतात
ग्रीष्माचा मग श्रावण होतो
मी भिजतो, मन ही भिजते
जेव्हा ती मला पहाते

नजर नाही तो तीरच असतो
ह्रदयाचा भेद अचूक घेतो
रोमियो (मी) पुरता घायाल होतो
जेव्हा ती मला पहाते

ओठ बंद पण नजर बोलते
मनातील सारे भेद खोलते
डोळ्यांच्या डोहात बुडविते
जेव्हा ती मला पहाते

प्रेमाचा मग त्सुनामी येतो
ह्रदयातूनी तो ऊतू जातो
बर्फ़ होवुनी मी पिघळतो
जेव्हा ती मला पहाते

...नेहमीच सालं हे असच होतं
...नेहमीच ती मला पहाते

No comments:

Post a Comment