Thursday, February 17, 2011

हक्क



रक्ताच्या नात्यातून अभावितपणे
काही काही नाजूक भावबंधातून
 किंवा कुठल्या ऋणानुबंधातून 
काही हक्क अवचित मिळतात....

त्यांचा एखादा हळवा कोपरा
 हृदयात कायम असतो वस्तीला 
ते हळवेपण कुस्करण्याचा
आपोआप मग हक्क मिळतो का?...

नकार स्वीकारण्याची 
ना ही पहिलीच वेळ आहे 
काहीतरी  तुटण्याच्या वेदनेची 
ना ही पहिलीच वेळ आहे......

नाकारले जाण्याचा अनुभव 
हा काही पहिलाच नाही
अगदी रक्ताच्या नात्यांनी 
अव्हेरणे काही पहिलेच नाही  ....

आत्ताचा हा मनात आकांत 
कळतंच नाही आहे मला
पण न केलेल्या गुन्ह्याची 
सजा फार्मावाल्यासारखे वाटते......

तुला नको असणारे नाकारणं 
हा हक्कच आहे तुझा 
पण म्हणूनच मला हवे असणारं 
मिळवण्याचा हक्क मी सोडून  दिला आहे ...

No comments:

Post a Comment