Saturday, February 5, 2011


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते ...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते ...

 मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते ...

हि दुनिया पाषाणाची, बोलून बदलली नाही  ...
मी बहर इथे शब्दांचे, नुसतेच उधळले होते ...

याचेच रडू आले कि, जमले न मला रडणेही  ...
मी रंग तुझ्या स्वप्नांचे, अश्रूत मिसळले होते ...

घर माझे शोधाया मी, वार्यापरी वणवण केली ...
जे दार खुले दिसले ते, आधीच निखळले होते ....

मी एकटाच त्या रात्री, आशेने तेवत होतो 
मी विझलो  तेव्हा सारे, आकाश उजळले होते ....

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते ...
 मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते ...

No comments:

Post a Comment