क्षणिक शब्दांचे बुडबुडे
आणि तुझ्या नजरेत नसलेली नजर
सारे काही समजायला
मलाच उशीर झाला रे......
मी बेखबर प्रेमात आकंठ
आणि एकदम बेसावध
तूझा तो परकेपणा
अचानक समोर ठाकला ...
सैरभैर मनाची माझ्या
समजूतच पटेना रे
आणि मी समजत होते ते
प्रेम ते .. प्रेमच नव्हते....?
तुझे निश्वास, तुझे स्पर्श
माझ्यासाठी नव्हतेच मात्र
आता ते उसनवारीचे देणं
अशक्यच आहे रे परत करणे...
तुझ्यासाठी फुलणारा रोमांच
आता आवरून घ्यायला हवा
जळी स्थळी दिसणारा तू
हृदयात बंद ठेवायला हवा....
तू नाहीस म्हंटल्यावर
आता सगळे ऋतू सारखेच वाटतात
कारण बहर असो व पानगळ
बघणेच सोडले आहे मी........
No comments:
Post a Comment