मी उठायचो ती बसायची मी हसायचो ती रुसायची मी इंग्लिश ऐकायचो ती मराठी गाणी ऐकायची मी action पाहायचो ती DDLJ मध्ये रमायची मी perfume दिला तर ती गजरा आन म्हणायची गजरा हातात दिला तर केसात माळ म्हणायची माळता येत नाही म्हणालो की माझ्यावर चिडायची वैताग आहे नुसता म्हणालो कि रड रड रडायची रात्री मधेच उठून ती चारोळीचा sms पाठवायची आणि नेमका त्याच वेळेस मला एकही ओळ नाही आठवायची मी blank sms पाठवला कि ती माझ्यावर जाम चिडायची आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून मला दिवसभर पिडायची त्या दिवशी मग मी एकटा होऊन राहायचो आली असेल तिची चारोळी म्हणून सारखा फोन पाहायचो दुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन असे काही तरी घडायचे चुकले रे माझे सख्या असे म्हणून तिनेच परत रडायचे अश्या रडा-रडीला कारणांची कमी नसते कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण याची कधी हमी नसते......... |
Wednesday, February 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment