Friday, February 18, 2011

वणवा....


गेलास तू माझ्या जीवनातून..
तुला जायचे होते म्हणून..
असा गुन्हा तरी मी काय केला..
गेलास म्हणून..

विचार तरी करायचा होतास..
माझ्या भावनांचा..
पण नाही खेळायचेच होता खेळ..
माझ्या जीवनाचा..

असं कसं दुखं मला..
देऊन गेलास..
अन माझं हसू माझ्याकडून..
घेऊन गेलास..

आला होतास माझ्या जीवनात..
गार वारा घेऊन..
पण मग जाताना का गेलास..
वणवा पेटवून..

No comments:

Post a Comment