आयुष्यातली चिरंतन मूल्य
सत्य, शिव यांचा सौंदर्य
तेच्ग बाळकडू रक्तातून वाहते
आणि तीच आहे ना संस्कृती.....
प्रत्येक सत्यासाठी
प्रत्येकवेळी होते दहन
मग ते कांचन असो व कंचनी
मगच मिळते शुद्धतेची हमी......
सीतेची अग्निपरीक्षा असो की
यज्ञकुंडातून प्रकटलेली द्रौपदी
त्यांना भ्रष्टाणारे हात मात्र
नेहमी पुढे धजावत राहणार........
संस्कृतीचे पाईक फक्त प्रेक्षक असतात
त्यांच्या बुद्धिचातुर्यामुळेच
सीतेला व्हावे लागते भूमिगत
आणि दृपाडीला उजाड साम्राज्याची सम्राज्ञी....
एवढी मोठी उदाहरणे हवीत तरी कशाला?
ते म्हणतात तसे असेल सत्य पवित्र
आणि त्या अग्निकुंडात ते स्वतःच असतील
तरी राहील हेच मत त्यांचे कायम? ........
No comments:
Post a Comment