Friday, February 4, 2011

आजही मला ते सर्व आठवतयं



आजही मला ते सर्व आठवतयं

 कालचं जणू सारे घडल्यासारखं वाटतंय 
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं 
वाटतंय 

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन 
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा उपयोग 
कधी झालाच नाही
 समोरच 
Canteen असल्याने तिकडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडूनच  ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो ते क्षण आठवले की आज हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं............ .

No comments:

Post a Comment