Monday, February 14, 2011

मी पुरुष बिच्चारा


समान संधी मध्ये आजच्या

मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलोअन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा
ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतोपण
विनाकारण लाईनमनहोऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचेपण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा
नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरलापण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा
तरी एकदा बघा सभेत
मी मलाच बिच्चारा म्हंटलो
तर पहातो काय
स्त्रीयांचा हंडा मोर्चा
अंगावर धावून आला
कारण काय म्हणे तर
अबले पणावर त्यांच्या
आम्ही घाला घातला
आता कसले काय
घरातला हंडा ही
सावधानतेने घेतो
नळाखाली हळूच लावून
लोकमत ची सखी
अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
 !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Thanks & Best Regards,

http://www.nirajdhane.blogspot.com/

No comments:

Post a Comment