Friday, February 4, 2011

राजे या जगात जगाव लागत.....




लाज वाटते राजेया जगात जगाव लागतं
समाजाच अध:पतनउघड्या डोळ्यांनी बघाव लागतं
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती,
शासन करणार्या तलवारींची गंजून गेलीत पाती,
आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्रप्रेमाच स्फुलिंग पेटवून तुम्ही निघून गेलात राजे,
पण......या पेट्लेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणार्या
आणि आमचीच मतं घेऊनशेवटी सत्तेने माजणार्या
गल्ली बोळातल्या पुढार्याला, "रयतेचा राजाम्हणाव लागत,
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांच काय पाणी,ते भारतात राहून बघून गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावरआता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखालीइथं इंग्रजीचीच पिपाणी वाजतेय,
माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखित बघाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत........

जांच्याकडे पैसा आहेत्यांच जगण झालय मस्त,
नि पोटासाठी राबणार्याच इथं मरण झालय स्वस्त,
किड्यामुंग्यांसारखी इथं जगताहेत माणसं,
दिवसाढवळ्या आपल मरण बघताहेत माणसं,
वेदना असह्य होतातम्हणून इच्छामरण मागाव लागत....
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊपोटी शिवबा जन्माला आला नाही,
घराघरातल्या जिजाऊ आता करियर वुमन होत आहेत,
आता एक करा राजे यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका,
अंन् कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका.
काय सांगू राजेआता इथल्या तरुणाईबद्दल बोलवत नाही.
नी तुमच्या आदर्शांच ओझइथल्या तरुण खांद्याना पेलवत नाही
कर्तव्य विसरून आमची तरुणाईआपल्याच मस्तीत मग्न आहे.
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

अन्यायअत्याचारअधर्मावर इथल्या माणसाच जिवापाड प्रेम जडलाय,
आणि हिंदुपतपातशाहीवर राजेदहशदवादाच सावट पडलय ,
बॉम्बस्फोटाच्या भीतीने,वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजेमोकळा श्वासही घेता येत नाही,
गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोषांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

स्वराज्य आहे इथं राजे,पण सुराज्याची पर्वा नाही,
म्हणतात ना..... कौरव सारे माजले आहेत आणि पांडवांची सत्ता नाही.
विरोध करण्याची हिंमत जाउन निष्क्रियता पक्की मुरली आहे
माझीही तलवार बोथट झालिये आता फक् शब्दांनाच धार उरली आहे,
समाज परिवर्तनाच चक्र इथं दुबळ्या हातांनाच फिरवावी लागतात
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

ताठ मानेंन जगाव म्हटल तर राजे आपलीच माणसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्तअखंड भारतच स्वप्न पाहु देत नाहीत,
तरी बर तुमचच रक्त वाहतायमाझ्या नसांनसांमधून म्हणून लिहाव लागत
पण तरीही लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

जातील राजे नक्की जातीलहेही दिवस एक दिवस,
स्वतःच्या चुकांची जाणीव होईल प्रत्येकालाच एक दिवस,
मात्र त्यासाठी प्रत्येकानेप्रयत् करायला हवेत,
बूडणार्याला काडिशिवायदुसरं काय लागतं तरायला?
पुन्हा एकदा त्याच डौलानभगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावनीनेआमची माथी नाहीत भडकणार...

जय भवानी!!!
जय शिवाजी!!!
जय महाराष्ट्र........   

No comments:

Post a Comment