|
स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , "स्व" ची जाणिव कधीच होत नाही, सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते, सवयींचे काय , त्या कशाही जडतात, हळु हळु अंगवळणीही पडतात, म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते? एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते. आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कुठलाच मार्ग ऊरत नाही, तरीपण विश्वास ठेवावा लागतो नाहीतर जगण्याची आशाच ऊरत नाही... |
|
No comments:
Post a Comment