रंगाच्या एखाद्या फटकाऱ्याने
चित्रच बदलून जावं तसं
तुझ्या एकाच शब्दानं
आपलं नातच बदलून गेलं ....
काय म्हणालास तू मला
सखी...
सखी मधलं सहचर्य
सगळ्या नात्यांचे पदर
एकत्र सांभळून धरावेत
तसाच वाटतं रे सर्व सामावणारे....
सखी ...खरच का तसच
म्हणजे तसच म्हणायचे आहे तुला ...
सखी संबोधनाने जणू
तू झनकारालीस सतार
तरल संवेदानाचे आवर्त
अंतरंगात निनादत आहेत...
हळुवार सगळे पदर
गोळा करून नाजूकपणे
तुझ्यामाझ्या नात्याची
करते नक्षीदार गुंफण .....
No comments:
Post a Comment