अग! असंच वाटतंय
खूप वर्ष झाली त्याला,
तो यायचं कांही थांबवत नाही
यायचं वेड लागलंय श्रावणाला!
विचारच करत नाही ग तो माझा
सारखा मला पोळत असतो,
आणि प्रत्येक वेळी येऊन
तुझ्या आठवणींच मीठ जखमेवर चोळत असतो....
अस वाटत! इंद्र धनुच्या रंगा सोबत
आता तुही हवी होतीस,
या श्रावण पर्यंत तरी
वाट माझी पहायची होतीस!
मला माहीत आहे
तुझ्या श्रावण आवडीचा आहे,
मला तर पसंत नाही
प्रश्न ज्याच्या त्याच्या निवडीचा आहे!
मलाही वाटायची गोडी
त्यावेळी बरोबर तू असायचीस.
माझ्या मिठीतून निघून
ह्या श्रावणाच्या कवेत भिजायचीस!
आता माझ्या मिठीत नको
पण या श्रावणाला तरी कवेत घे,
राख केलेल्या या
जीवनाला तुझ्या ओंजळीचा स्पर्श तरी दे!
असा किती छळशील रे
माझ्या जीवनाला!
म्हणून सांगतो
तू नको येऊ श्रावणाला,
तू नको टू श्रावणाला !!!!
खूप वर्ष झाली त्याला,
तो यायचं कांही थांबवत नाही
यायचं वेड लागलंय श्रावणाला!
विचारच करत नाही ग तो माझा
सारखा मला पोळत असतो,
आणि प्रत्येक वेळी येऊन
तुझ्या आठवणींच मीठ जखमेवर चोळत असतो....
अस वाटत! इंद्र धनुच्या रंगा सोबत
आता तुही हवी होतीस,
या श्रावण पर्यंत तरी
वाट माझी पहायची होतीस!
मला माहीत आहे
तुझ्या श्रावण आवडीचा आहे,
मला तर पसंत नाही
प्रश्न ज्याच्या त्याच्या निवडीचा आहे!
मलाही वाटायची गोडी
त्यावेळी बरोबर तू असायचीस.
माझ्या मिठीतून निघून
ह्या श्रावणाच्या कवेत भिजायचीस!
आता माझ्या मिठीत नको
पण या श्रावणाला तरी कवेत घे,
राख केलेल्या या
जीवनाला तुझ्या ओंजळीचा स्पर्श तरी दे!
असा किती छळशील रे
माझ्या जीवनाला!
म्हणून सांगतो
तू नको येऊ श्रावणाला,
तू नको टू श्रावणाला !!!!
No comments:
Post a Comment