Sunday, February 20, 2011

आला रे आला……!!!!


आज दुपारी मला,
तीचा मेसेज आला......
अडकलेला श्वास,
पुन्हा चालु झाला......

ती म्हणे रुसलास का,
बोलत का नाहीस.......
रोज कट्ट्यावर असतो,
आता दिसत नाहीस......

तीने नुसतं पाहिलं तरी,
महिना आरामात जातो.....
एक शब्द बोलली जरी,
मी आभाळात जातो......

कुठल्या का होईना कारणे,
निदान तीने आठवले मला......
चाहत्यांच्या कैफ़ातही,
नाही डावलले मला......

तीचा आवाज ऐकण्या,
मी नेहमीच भुकेला असे......
माझ्या विनंतीकडे मात्र,
लक्ष तीचे कधी नसे......

मी आता खचलो होतो,
हरल्यासारखे वाटत होते......
तीच्या पाऊलखुणांचेही,
ठसे मागे उरले नव्हते.....

पण अचानक !!!!!!!!!!!
आज दुपारी मला,
तीचा मेसेज आला......
अडकलेला श्वास,
पुन्हा चालु झाला......

*****************************************

http://www.nirajdhane.blogspot.com/


No comments:

Post a Comment