Thursday, February 10, 2011

कॉलेज..गम्मत..


कॉलेजचा पहिला दिवस
मुसळधार पाउस
खोडसाळ वारा भन्नाट
छत्री उलट पुलट
नविन चपला सपसप
चिखल उडवी रपारप
शुभ्र सलवार माखलेली
मी पावसात भीजलेली
हॉल मधे जाउ कशी
ऍड्रेसला हजेरी लाउ कशी
सिनीयर्स..रॅगींग..बाप रे
कोणीतरी मला वाचवा रे
कोणीतरी एवढ्यात पुटपुटल
मागचं दार आहे खुलं
भेट सुरु अधुन मधुन
कधी चुकुनकधी जाणुन
डिग्री घेउन तो गेला
तरी येउन भेटु लागला
माझेही शिक्षण पुरे झाले
हॉस्टेल मधे रहाणे बंद झाले
आज बागेत मी नातवंडांसोबत
तोही दिसला नातवंडांसोबत
ओळखले आम्ही एकमेकांना
गम्मत वाटली ते दिवस आठवताना
खरी गम्मत तर पुढेच घडली
त्याची 'तीआणी माझे 'हे'हातात त्यांच्या भेळ पुडे
एकाच कॉलेजचे आम्ही दोघेओळख त्यांनी करुन दिली !!

No comments:

Post a Comment