Tuesday, February 1, 2011

जगणे-मरणे



गेलो असा नि:शब्द की
आलोच नाही
पड्लो असा सरणावरी की
जगलोच नाही
पर्वा कशाला वेदनेची
दु:खासवे येतेच ती
झालो असा बेहोश की
प्यालोच नाही
सोडली कां साथ ऐसी
सांग तू मध्यावरी
मिटलो असा शेवटी की
फुललोच नाही
गर्द झाले अंधार
अन सूर्य ही गेले कुठे
लपलो असा धास्तावूनी की
दिसलोच नाही

No comments:

Post a Comment